esakal | मोठी बातमी : मॉडर्नाची लस अंतिम टप्प्यात; एका डोसची असेल एवढी किंमत
sakal

बोलून बातमी शोधा

Moderna aims to price coronavirus vaccine at $50-$60 per course
  • मानवी चाचण्यांना सुरुवात
  • लस सुरक्षित असल्याचा कंपनीचा दावा

मोठी बातमी : मॉडर्नाची लस अंतिम टप्प्यात; एका डोसची असेल एवढी किंमत

sakal_logo
By
टीम ई सकाळ

सियाटल (अमेरिका) : कोरोना विषाणूविरोधात लस तयार करण्यासाठी जगभरात अनेक ठिकाणी प्रयत्न सुरु असून यात काही कंपन्यांनी आघाडी घेतली आहे. त्यापैकीच एक कंपनी असलेल्या अमेरिकेतील मॉडर्नाने तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना सुरुवात केली आहे. ही कंपनी आता लस बाजारात आणण्याच्या केवळ एक टप्पा अलीकडे आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

मॉडर्ना कंपनीने ६३ दिवसांमध्ये मानवी चाचण्यांचा टप्पा गाठला आहे. त्यांनी केंब्रिज येथील प्रयोगशाळेत मानवी चाचण्यांना सुरुवात केली आहे. त्यांनी तयार केलेल्या ‘एम-आरएनए’ लसीचे प्राथमिक टप्प्यावरील निष्कर्ष चांगले आल्याचे त्यांनी मे महिन्यात जाहीर केले होते. या कंपनीच्या म्हणण्यानुसार, या लशीमुळे शरीरात विषाणूला प्रभावहीन करणारी प्रतिपिंडे तयार होतात. या प्रतिपिंडांमुळे शरीरातील रोग प्रतिकारशक्तीला बळ मिळून संसर्ग पसरण्यापासून रोखला जातो. कोरोनाग्रस्तांवर उपचारासाठी एम-आरएनए लशीचा वापर करण्यासाठी या कंपनीला परवानगी मिळू शकते, असा निष्कर्ष दिलेल्या माहितीच्या आधारे काढता येतो. पहिल्या टप्प्यातील निष्कर्ष पाहता ही लस सुरक्षित असल्याचे दिसते, असे आयोवा विद्यापीठातील प्राध्यापक आणि औषध निर्माण तज्ज्ञ अली सालेम यांनी सांगितले. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीमध्ये अमेरिकेतील ३० राज्यांमधील ३० हजार स्वयंसेवकांवर चाचणी घेतली जाणार आहे. ही लस दिल्याने कोरोनापासून बचाव करता येतो का? आणि कोरोनाग्रस्तांना लस दिल्यावर त्यांचा जीव वाचविता येतो का? या दोन प्रश्‍नांचा शोध तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांतून घेतला जाणार आहे. ‘मॉडर्ना’च्या दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निष्कर्ष अद्याप आलेले नाहीत.

लस कशी तयार होते?
शरीरात ज्यावेळी विषाणूचा संसर्ग होतो, त्यावेळी रोग प्रतिकार यंत्रणा कार्यान्वित होते आणि प्रतिसाद देण्यास सुरुवात करते. सर्वसाधारणपणे लसी या प्रतिसादाचा फायदा उठवत शरीरात निष्क्रीय विषाणू सोडतात. यामुळे प्रतिकार यंत्रणा वेगवान होते. अशी लस तयार करण्यास वेळ लागतो. कारण शास्त्रज्ञांना संबंधित विषाणूसारखाच निष्क्रीय विषाणू तयार करावा लागतो. एम-आरएनए ही लस न्युक्लिक ॲसिडपासून तयार केली आहे. हे न्युक्लिक ॲसिड आपल्या पेशींपर्यंत पोहोचून कोणते प्रथिन तयार करायचे, याचा निर्णय घेते आणि त्यानुसार प्रतिकार यंत्रणेला कार्यान्वित करते. यामुळे वेगवान निष्कर्ष मिळून लस लवकर तयार होऊन काही तासांत अथवा एका दिवसात चाचणी होऊ शकते, असा ‘मॉडर्ना’चा दावा आहे.

लसाचा किंमत किती असेल?
ही लस बाजारात आल्यावर सहाजिकच या लसीची किंमत किती असणार हा प्रश्न सर्वांना पडतो. या लसीची किंमत साधारणत: ५० ते ६० अमेरिकन डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार ४ ते ५हजार रुपये प्रतिलस अशी असेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. परंतु, कुठल्याही देशात ही लस नागरिकांना विकत घेण्याची वेळ येणार नसल्याचे बोलले जात आहे. लसीकरण मोहिमेअंतर्गत ज्या त्या देशातील शासनव्यवस्था ही लस विकत घेऊन लोकांना देण्याचे काम युद्धपातळीवर करण्याची शक्यता आहे. 

 


लस कसे काम करते?
कोरोना विषाणूभोवती प्रोटीन स्पाइकचे आवरण (प्रथिनांचे काटेदार आवरण) असते. मॉडर्ना कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, एम-आरएनए लस मानवी शरीरात टोचल्यावर ती या आवरणाचा शोध घेते आणि त्याला प्रभावहीन करण्यासाठी प्रतिपिंडे तयार करते. यामुळे या विषाणूने शरीरात संसर्ग पसरविण्याआधीच त्याला अटकाव घातला जातो.

loading image