दहशतवादाचा बीमोड; स्थिर अफगाणिस्तान: मोदी

वृत्तसंस्था
रविवार, 4 डिसेंबर 2016

अमृतसर - दहशतवादाविरोधात शांतता व कृतिहीनता बाळगल्यास त्यामुळे केवळ दहशतवादी व त्यांच्या "मालकां'चा फायदा होईल, असे प्रतिपादन भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) "हार्ट ऑफ एशिया' परिषदेस संबोधित करताना केले. पंतप्रधानांनी अफगाणिस्तानमध्ये भारताकडून राबविल्या जात असलेल्या विविध प्रकल्पांचा विशेष उल्लेख करत राजकीयदृष्टया स्थिर अफगाणिस्तानास पाठिंबा व्यक्‍त केला.

पंतप्रधान म्हणाले -
# आज आपली सुरु असलेली बैठक हा आंतरराष्ट्रीय समुदायाच्या अफगाणिस्तानमधील शांतता व स्थिरतेप्रती असलेल्या कटिबद्धतेचा पुरावा आहे. अफगाणिस्तानमधील जनतेचे बाहेरील धोक्‍यांपासून संरक्षण करणे हाच आपली वचने व कृतींचा उद्देश असावयास हवा
# अफगाणिस्तान व या भागामधील इतर देशांमधील भौगोलिक संपर्क अधिकाधिक सशक्‍त व्हावा, यासाठी आपण एकत्रितरित्या काम करणे आवश्‍यक आहे
# अफगाणिस्तानमधील शांततेसाठी केवळ भाषणे करुन उपयोग होणार नाही. शब्दांना प्रभावी कृतीची जोड द्‌यावी लागेल. ही कृती केवळ दहशतवाद्यांविरोधात नको; तर त्यांना आश्रय देणाऱ्या, मदत करणाऱ्यांविरोधातही ही कृती आवश्‍यक आहे
# अफगाणिस्तानमधील शूर भगिनी व बंधुंप्रती भारताची असलेली कटिबद्धता ही अविचल आहे
# अफगाणिस्तानच्या विकासाकरिता आम्ही आमच्यासारखी वैचारिक धारणा असलेल्या देशांबरोबर काम करण्यास तयार आहोत.
# अफगाणिस्तानमध्ये विकास व शांतता प्रस्थापित करण्यासाठी हार्ट ऑफ एशियाच्या या चर्चासत्रामधून मार्ग निघेल, अशी मला आशा आहे
# अफगाणिस्तान हे शांततेचे केंद्र बनविण्यासाठी आपण सर्व प्रयत्नशील राहुया

भारत, चीन, रशिया, इराण आणि पाकिस्तानसमवेत 14 देशांचे वरिष्ठ अधिकारी या परिषदेत सहभागी झाले असून, अन्य 17 सहयोगी देशांच्या प्रतिनिधींचाही यामध्ये समावेश आहे. तालिबान्यांच्या संकटाचा सामना करणारा अफगाणिस्तानदेखील या परिषदेत कळीचा मुद्दा ठरणार असून भारत-अफगाणदरम्यान अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांत सहकार्य करार होणे अपेक्षित आहे.

Web Title: Modi emphasizes on stable Afghanistan