मोदींनी अनुभवला वेगवान प्रवास

पीटीआय
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

टोकिओ - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंझो ऍबे यांनी जपानची सर्वांत वेगवान शिनकानसेन बुलेट ट्रेनमधून प्रवास केला.

शिनकानसेनसारखीच बुलेट ट्रेन भारतात सुरू करण्याचा विचार केला जात आहे. मोदी आणि ऍबे यांनी टोकिओ ते कोबेपर्यंत बुलेट ट्रेनमधून प्रवास केला. या रेल्वेचा वेग 240 किलोमीटर ते 340 किलोमीटर प्रतितास इतका आहे.

पंतप्रधानांनी प्रवासादरम्यान ऍबे यांच्यासमवेत चर्चा करतानाचे छायाचित्र ट्विटरवरून शेअर केले आहे. ट्विटमध्ये म्हटले, की पंतप्रधान शिंझो ऍबेसमवेत जात असून आम्ही शिनकानसेन ट्रेनने प्रवास करत आहोत.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी ट्विट करताना म्हटले, की वैशिष्ट्यपूर्ण यात्रेत वैशिष्ट्यपूर्ण मैत्री. मुंबई ते अहमदाबाद यादरम्यान बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला 2018 मध्ये सुरवात होणार आहे आणि ही रेल्वेसेवा 2023 मध्ये प्रारंभ होईल. या तंत्रात जपानची प्रणाली वापरली जाणार आहे. ऍबे यांनी काल पंतप्रधान मोदी यांच्यासमवेत संयुक्त पत्रकार परिषदेत म्हटले, की बुलेट ट्रेनच्या रचनेचे काम या वर्षाखेर सुरू होईल. ही महत्त्वाकांक्षी योजना ही दोन्ही देशातील संबंधाला आणखी दृढ करेल. या बुलेट ट्रेनच्या नेटवर्कच्या माध्यमातून भारतातील आर्थिक विकासाला चालना मिळेल. बुलेट ट्रेन शिनकासेनची सुरवात जपानमध्ये 1964 सुरवात झाली होती.

Web Title: Modi has experienced rapid travel