होळीच्या दिवशी गैरवर्तनाला बळी पडलेल्या जपानी तरुणीची प्रतिक्रिया, म्हणाली 'Loves India' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Holi

होळीच्या दिवशी गैरवर्तनाला बळी पडलेल्या जपानी तरुणीची प्रतिक्रिया, म्हणाली 'Loves India'

होळीच्या मुहूर्तावर दिल्लीतील पहाडगंज भागात जपानी तरुणीसोबत काही मुलांनी गैरवर्तन केल्याची घटना समोर आली होती. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये काही मुले जपानी तरुणीसोबत गैरवर्तन करताना दिसत आहेत. आता या घटनेबाबत जपानी तरुणीने सोशल मीडिया एक पोस्ट शेयर केली आहे. तिने यासंबधीचे एक ट्विट केलं आहे.

आपल्या ट्विटमध्ये मुलीने संपूर्ण घटनेबद्दल सांगितले आणि म्हंटले आहे की, "मला भारताबद्दलचे सर्व काही आवडते, मी तेथे अनेकदा गेले आहे आणि तो एक आकर्षक देश आहे. भारत आणि जपान कायमचे 'टोमोडाची' (मित्र) राहतील."

तरुणीसोबत गैरवर्तन करतानाचा हा व्हायरल व्हिडिओ शुक्रवारी समोर आला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी एका अल्पवयीन मुलासह तीन आरोपींना अटक केली. हा व्हिडिओ शेयर केल्यानंतर सेलिब्रिटी आणि राजकारण्यांसह नेटिझन्स संतप्त झाले. विनयभंग करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या वागण्यामुळे "देशाला लाज आणली" असंही काहींनी म्हंटलं होतं. व्हिडिओ व्हायरल होताच, जपानी मुलीने सांगितले की ती आधीच भारत सोडून बांग्लादेशात पोहोचली आहे आणि तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये तिचे काय झाले ते स्पष्ट करेल.

तरुणीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर केला पोस्ट

शनिवारी, जपानी मुलीने पोस्ट केले आणि सांगितले की तिने या घटनेचा व्हिडिओ पहिल्यांदा तिनेच पोस्ट केला होता, परंतु जेव्हा व्हिडिओ व्हायरल होऊ लागला तेव्हा ती घाबरली आणि नंतर तिने तो व्हिडिओ सोशल मिडियावरून हटवला. मुलीने जपानी भाषेत लिहिले, 'व्हिडिओमुळे ज्यांना दुखावले त्यांची आम्ही मनापासून माफी मागतो.' जपानी तरुणीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, होळीच्या दिवशी महिलांसाठी घराबाहेर पडणे धोकादायक असल्याचे तिने ऐकले आहे.

ही घटना घडली तेव्हा ती तिच्या 35 मैत्रिणींसोबत होती. ती म्हणाली की व्हायरल व्हिडिओ तिच्या सोबत असणाऱ्या जपानी मित्राने बनवला होता. होळीबद्दल काहीही नकारात्मक सांगण्याचा त्यांचा हेतू नव्हता. पोलिसांच्या कारवाईवर विश्वास व्यक्त करताना महिलेने सांगितले की, तिला भारतातील प्रत्येक गोष्ट आवडते आणि तिने अनेकदा भारताला भेट दिली आहे.

व्हायरल झालेला व्हिडिओ

व्हायरल व्हिडिओमध्ये एक जपानी मुलगी होळी खेळताना दिसत आहे. यादरम्यान लोक तिला स्पर्श करताना आणि त्याच्या चेहऱ्यावर जबरदस्तीने रंग लावताना दिसत आहेत. त्यानंतर एक मुलगा तिच्या डोक्यावर अंडी फोडताना दिसतो. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मुलगी 'बाय', 'बाय' म्हणताना दिसत आहे. इतकंच नाही तर व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये ती मुलगी एका व्यक्तीला चापट मारतानाही दिसत आहे.

दरम्यान, या संबंधित एका अल्पवयीन मुलासह तीघांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याविरुद्ध डीपी कायद्यांतर्गत कारवाई सुरू करण्यात आली आहे. पुढील कायदेशीर कारवाई मुलीच्या तक्रारीनुसार केली जाणार असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

टॅग्स :JapanJapaneseviral video