मौल्यवान वस्तू मिळविण्यासाठी माकडांना द्यावे लागते अन्न

पीटीआय
मंगळवार, 6 जून 2017

ही माकडे भाविक आणि मंदिरातील कर्मचाऱ्यांकडील मौल्यवान वस्तू हिसकावून नेतात आणि अन्नाची वाट बघत बसतात. हा एक वेगळाच व्यवहार असून तो केवळ बालीच्या उल्लूवट्टू मंदिरातच अतिशय सहजपणे चालतो, असे आढळून आल्याचे ब्रोटकॉर्न म्हणाले.

सिंगापूर - इंडोनेशियाच्या मंदिरात माकडेच भाविकांवर दरोडा टाकत असल्याचे एका संशोधनावरून उघडकीस आले आहे. ऐकून आश्‍चर्य वाटेल; पण या मंदिरात येणाऱ्या भाविकांकडील मौल्यवान वस्तू ही माकडे हिसकावून नेतात. त्यांना अन्न दिल्यानंतर त्या परत मिळतात. या मंदिरात येणाऱ्या भाविकांच्याकडील गॉगल्स, टोप्या, कॅमेरा आणि पैसेही ते हिसकावून नेतात, असे संशोधन बेल्जियमच्या लिगे विद्यापीठातील संशोधक फॅनी ब्रोटकॉर्न यांनी सांगितले.

ही माकडे भाविक आणि मंदिरातील कर्मचाऱ्यांकडील मौल्यवान वस्तू हिसकावून नेतात आणि अन्नाची वाट बघत बसतात. हा एक वेगळाच व्यवहार असून तो केवळ बालीच्या उल्लूवट्टू मंदिरातच अतिशय सहजपणे चालतो, असे आढळून आल्याचे ब्रोटकॉर्न म्हणाले. या मंदिराजवळ माकडांचे चार गट राहतात, त्यातील दोन गट हे बहुतांश वेळ हे पर्यटकांपाशीच राहतात आणि त्यांच्यावर दरोडा टाकतात, असे या संशोधकाने सांगितले.

वास्तविक हे एका छोट्या गटावरील संशोधन असून संस्कृती एका गटाकडून दुसऱ्या गटाकडे कशी जाते हे बघण्यासाठी ब्रोटकॉर्नने माकडांवर हे संशोधन केले आहे. हे संशोधन प्रिमॅटस या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

Web Title: Monkeys rob tourists