अल्जेरियामध्ये लष्कराचे विमान कोसळले ; 250 हून अनेकांचा मृत्यू

वृत्तसंस्था
Wednesday, 11 April 2018

आफ्रिका खंडातील अल्जेरियामध्ये लष्कराचे विमान आज (बुधवार) सकाळी कोसळले. या भीषण दुर्घटनेत विमानातील 250 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या विमानामध्ये अल्जेरियन सैनिक मोठ्या प्रमाणावर असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अल्जीयर्स : आफ्रिका खंडातील अल्जेरियामध्ये लष्कराचे विमान आज (बुधवार) सकाळी कोसळले. या भीषण दुर्घटनेत विमानातील 250 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या विमानामध्ये अल्जेरियन सैनिक मोठ्या प्रमाणावर असल्याचे सूत्रांनी सांगितले. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून, बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.  

Plane crash algeria

अल्जेरियातील हे विमान दक्षिण-पश्चिमी अल्जेरियाकडे जात होते. ही दुर्घटना अल्जेरियाची राजधानी अल्जीयर्सपासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या बॉफेरीक लष्करी विमानतळावर घडली. या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर मदत कार्यासाठी १४ रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या १० गाड्या रवाना झाल्या. या दुर्घटनेत विमानातील सर्वांचा मृत्यू झाल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली. लष्काराच्या या विमानातून सैनिकांसोबत काही उपकरणेही नेण्यात येत होती. भारतीय वेळेनुसार सकाळी आठच्या सुमारास ही दुर्घटना घडली. 

दरम्यान, अपघातग्रस्तांच्या मदतकार्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी लष्करी विमानतळाकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आल्याची माहिती देण्यात येत आहे. सध्या यातील बाधितांच्या बचावासाठी बचाव पथक युद्ध पातळीवर कार्य करत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: More than 250 killed in Algerian military plane crash