पाकिस्तानात सर्वात जास्त भ्रष्टाचार; डेन्मार्क, न्यूझीलंडमध्ये सर्वांत कमी भ्रष्टाचार

वृत्तसंस्था
शनिवार, 25 जानेवारी 2020

भ्रष्टाचारावर लगाम लावणे कठीण
ज्या देशांमध्ये निवडणुकीत पैशांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो आणि जेथे सरकार श्रीमंत आणि प्रभावशाली लोकांचाच आवाज ऐकते, तेथे सर्वाधिक भ्रष्टाचार होतो, असे निरीक्षण ‘ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल’ने नोंदविले आहे. भारत, ऑस्ट्रेलियासारख्या लोकशाही व्यवस्था असलेल्या देशांमध्ये बडे उद्योग नियम डावलून समूह राजकीय पक्षांना गैरमार्गाने आणि अपारदर्शी व्यवहारातून पैसे पुरवीत असतात. यामुळे भ्रष्टाचाराला लगाम घालणे कठीण असल्याचे मत या संस्थेने नोंदविले आहे.

क्रमवारी... (कमीपासून जास्त भ्रष्टाचारी देश)
१) डेन्मार्क आणि न्यूझीलंड 
२) फिनलंड
३) सिंगापूर
४) स्वीडन 
५) स्वित्झर्लंड 
७) नॉर्वे
८) नेदरलॅंड 
९) जर्मनी आणि लग्झेंबर्ग 
८०) भारत, चीन, घाना, मोरोक्को
१२०) पाकिस्तान

दावोस (स्वित्झर्लंड) - भारतात भ्रष्टाचार हा जणू रोजच्या जगण्याचाच भाग झाला आहे. सरकारी कामे करण्यासाठी ‘हात ओले’ करण्याचा अनुभव अनेकांनी घेतलेला असेल. भारतातील भ्रष्टाचाराचे प्रतिबिंब ‘ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल’ या संस्थेने जाहीर केलेल्या भ्रष्टाचार निर्देशांक यादीत (करप्शन परसेप्शन इंडेक्‍स- सीपीआय) पडल्याचे दिसत आहे. यात जगातील १८० देशांमध्ये भारताचे स्थान ८० वे आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारताची घसरण
तज्ज्ञ आणि उद्योग क्षेत्राशी संबंधित व्यक्तींच्या मतांनुसार जागतिक आर्थिक परिषदेत जाहीर झालेल्या ‘सीपीआय’च्या अहवालात १८० देशांची आणि प्रांतांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्या-त्या देशांत सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या व्याप्तीच्या आधारे गुणांसह क्रमांक देण्यात आले आहेत. यात भारत ४१ गुणांसह ८० व्या स्थानावर आहे. या स्थानावर भारतासह चीन, बेनिन, घाना आणि मोरोक्को हे देश आहेत. भारताचा शेजारी देश पाकिस्तान हा १२० व्या क्रमांकावर आहे. शेजारील देशांच्या तुलनेत भारतीची स्थिती चांगली असली, तरी गेल्या वर्षाच्या तुलनेत भारत दोन स्थानाने घसरला आहे. गेल्या वर्षी भारताचा क्रमांक ७८ वा होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: more corruprion in pakistan