आई विमानतळावरच विसरली बाळाला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 मार्च 2019

रियाध (सौदी अरब) : सौदी अरबमधील एका अजब घटनेमुळे उड्डान केलेले विमान तातडीने पुन्हा विमानतळावर उतरवावे लागले.   आपल्या तान्ह्या बाळाला आई विमानतळावरच विसरून विमानात येऊन बसली. काही वेळातच ही बाब लक्षात आल्याने अस्वस्थ झालेल्या आईने वैमानिकाला विमान पुन्हा खाली उतरविण्याची विनंती केली. 

फ्लाईट एसव्ही 832 या हे विमान सौदी अरबमधील जेद्दाह विमानतळावरून मलेशियाची राजधानी क्वालालम्पूरला निघाले होते. परंतु, महिलेच्या जीव कासावीस होताना पाहून वैमानिकाने प्रसंगावधान साधत पुन्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला आणि विमान पुन्हा विमानतळावर उतरवण्याची परवानगी मागितली. नियंत्रण कक्षानेही ती दिली आणि काही वेळाच्या अजब घटनांनतर विमान खाली उतरले.

विमान खाली उतरताच आई तातडीने वेटींग रुम मध्ये विसरेल्या बाळाकडे धाव घेतली. या काही नाट्यमय घटनेनंतर आईला तिचे बाळ पुन्हा परत मिळाले. यानंतर बाळ आई दोघांनाही घेऊन विमानाने पुन्हा आकाशात झेप घेतली. वैमानीक आणि विमानतळावरील नियंत्रण कक्षाने केलेल्या सहकार्याबद्दल आईने सर्वांचे आभार मानले.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mother forgot her child at airport