esakal | अखुंदजादा सुप्रीम लीडर; तर असं असणार आहे तालिबान सरकार
sakal

बोलून बातमी शोधा

अखुंदजादा सुप्रीम लीडर; तर असं असणार आहे तालिबान सरकार

अखुंदजादा सुप्रीम लीडर; तर असं असणार आहे तालिबान सरकार

sakal_logo
By
टीम ई सकाळ

काबूल : अफगाणिस्तानमधील घडामोडींना आता आणखी वेग आलाय. अमेरिकेने आपलं सगळं सैन्य काल 31 ऑगस्टच्या मुदतीमध्ये माघारी घेतलं आहे. त्यामुळे तालिबानने देशावर ताबा मिळवल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आलाय. लवकरच अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं सरकार आकाराला येऊ शकतं. मिळालेल्या माहितीनुसार, तालिबान इराण मॉडेलच्या आधारावर सरकार बनवणार असल्याचा दावा केला जातोय. तालिबानचा लीडर मुल्ला अखुंदजादा सुप्रीम लीडर बनण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: हवा प्रदुषणामुळे 40 टक्के भारतीयांचं आयुष्य 9 वर्षांनी होणार कमी

तालिबानच्या राजवटीत सुप्रीम लीडर हे पद राष्ट्राध्यक्ष पदापेक्षाही सर्वोच्च आहे. अखुंदजादाच्या काऊन्सिलमध्ये 11 ते 70 जणांचा समावेश असू शकतो. त्यांचं केंद्र कंदाहार असू शकतं. मुल्ला बरादर किंवा मुल्ला याकूब याची पंतप्रधान पदी वर्णी लागू शकते. मुल्ला याकूब हा मुल्ला उमरचा मुलगा आहे. सुप्रीम लीडर अखुंदजादा कंदाहारमध्येच राहील. पंतप्रधान आणि सरकारमधील इतर मंत्री काबूलमधून सरकार चालवतील. तालिबान अफगाणिस्तानातील सध्याचे संविधान रद्द करुन 1964-65 मधील जुने संविधान पुन्हा एकदा लागू करु शकतील. कारण तालिबानचं असं म्हणणं आहे की, हे नवं संविधान पाश्चिमात्यांच्या वळचणीला गेलं आहे. येत्या 5 ते 7 दिवसांमध्ये हे तालिबानी सरकार बनू शकतं आणि यासंदर्भातील चर्चा गेल्या चार दिवसांपासून सुरु आहेत.

हेही वाचा: कोरोनाचा आणखी एक धोकादायक व्हेरिएंट, लसही ठरते निष्प्रभ - WHO

पंजशीर संघर्षात ३५० तालिबानी ठार

अफगाणिस्तानातून अमेरिकेची माघार झाल्यानंतर तालिबानला मोकळे रान मिळाले आहे. परंतु पंजशीरचा भाग जिंकणे तालिबानला कठीण जात आहे. या क्षेत्रावर ताबा मिळवण्यासाठी तालिबानचे दहशतवादी दररोज लढाई करत आहेत. काल रात्री तालिबान आणि नॉर्दन अलायन्स यांच्यात पुन्हा युद्ध झाले. या युद्धादरम्यान ३५० हून अधिक तालिबानचे दहशतवादी मारले गेल्याचा दावा नॉर्दन अलायन्सने केला आहे.

पंजशीर भागात सध्या घमासान लढाई सुरू आहे. काल तालिबानने गोलबहारहून पंजशीरला जोडणारा पूल उडवून दिला. सध्या युद्ध सुरू असल्याने पंजशीरच्या परवान प्रांताला जोडणारा मार्ग देखील बंद झाला आहे. एवढेच नाही तर तालिबानने मुख्य मार्गावर कंटेनर आणून ठेवले असून शुतूल जिल्ह्यावर ताबा मिळवला. नॉर्दन अलायन्सने या युद्धात ३५० हून अधिक तालिबानी दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा केला. मात्र त्यास दुजोरा मिळू शकला नाही.

loading image
go to top