मदरशातील स्फोटात मुख्य मौलवी ठार

वृत्तसंस्था
मंगळवार, 9 मे 2017

हनाफी यांना लक्ष्य करून हा बॉंबस्फोट करण्यात आला; मात्र त्यांना लक्ष्य का करण्यात आले, याचे कारण अद्याप समजले नसून या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणी स्वीकारलेली नाही.

काबूल : अफगाणिस्तानमधील उत्तर परवान प्रांतातील चराकर येथील मदरशात बॉंबस्फोट होऊन मुख्य धर्मगुरू मौलवी अब्दुल रहिम हनाफी ठार झाले, तर चार विद्यार्थी जखमी झाले. मंगळवारी सकाळी हा स्फोट झाला.

उपराज्यपाल शाह वली शाहीद यांनी ही माहिती दिली. हनाफी यांना लक्ष्य करून हा बॉंबस्फोट करण्यात आला; मात्र त्यांना लक्ष्य का करण्यात आले, याचे कारण अद्याप समजले नसून या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणी स्वीकारलेली नाही.

हा हल्ला म्हणजे दहशतवादी असल्याची शंका शाहीद यांनी व्यक्त करून वर्गामध्ये बॉंब कसा आणला, याची चौकशी सुरू असल्याचे ते म्हणाले.

Web Title: muslim religious guru died blast in kabul's madarsa