म्यानमारच्या विमानाचे अंदमानमध्ये सापडले अवशेष; सर्व प्रवाशांचा मृत्यू

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 जून 2017

म्यानमार लष्कराच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेआठच्या सुमारास अंदमानजवळ विमानाचे अवशेष सापडले. याबरोबरच काही मृतदेहही सापडले आहेत.

यंगून - बेपत्ता झालेल्या म्यानमारच्या लष्करी विमानाचे अवशेष अंदमान बेटाजवळील समुद्रात सापडले. विमानातील सर्व 112 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

म्यानमार लष्कराच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेआठच्या सुमारास अंदमानजवळ विमानाचे अवशेष सापडले. याबरोबरच काही मृतदेहही सापडले आहेत. नौदलाकडून या विमानाचा शोध घेण्यात येत होता. दक्षिण म्यानमारमधील लाँगलॉनपासून हे ठिकाण जवळ आहे.

म्यानमारच्या दक्षिणेतील शहर मेरगुई आणि यंगून यादरम्यान विमान बेपत्ता झाले होते. म्यानमारच्या लष्करप्रमुख आणि अधिकाऱ्यांनी या घटनेला दुजोरा देत विमानाचा शोध सुरु केला होता. दावेई शहराजवळ पोचल्यानंतर बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास विमानाशी संपर्क तुटला होता. विमानातील सर्व प्रवासी हे म्यानमारच्या किनाऱ्यावर तैनात असलेल्या सैनिकांच्या कुटुंबातील सदस्य होते. तांत्रिक बिघाडामुळे ही दुर्घटना घडल्याची शक्यता आहे.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
मुख्यमंत्री येईपर्यंत जाळू नका; शेतकऱ्याने चिठ्ठी लिहून केली आत्महत्या
तिडके, डोईफोडेचे अपराध अन् निशब्द पंकजा
मंदसोरच्या जिल्हाधिकारी, एसपींची बदली; राहुल गांधी शेतकऱ्यांच्या भेटीला
धुळे: कर्जमाफीसाठी शिवसेनेचे 'जलसमाधी' आंदोलन
पाकिस्तानचा दक्षिण आफ्रिकेवर 19 धावांनी विजय​
#स्पर्धापरीक्षा - बुद्धिबळ : कार्लसनची जगज्जेतेपदाची हॅट्ट्रीक​
शेतकऱ्यांच्या जिवावर उठलेले सरकार आंदोलनावरून काँग्रेस, माकपचे टीकास्त्र​
जनावरे खरेदी-विक्री निर्बंधास सर्वोच्च न्यायालयात आव्हान

Web Title: Myanmar’s military plane finds crashed plane, bodies in Andaman Sea