म्यानमारमध्ये संघर्ष पेटला : राजकीय नेत्यांच्या वाहनांवर सशस्त्र हल्ला; 12 ठार

myanmar armed attack
myanmar armed attack

यंगून (म्यानमार) - म्यानमारमधील स्वप्रशासित क्षेत्राच्या माजी सत्ताधिकाऱ्यांच्या समितीतील प्रमुख सदस्याच्या ताफाऱ्यावर शनिवारी सशस्त्र हल्ला करण्यात आला. त्यात नऊ नागरिक आणि तीन पोलिसांसह बारा जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती झिन्हुआ या वृत्तसंस्थेने शनिवारी दिली. आँग स्यान स्यू की यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सरकारविरोधात बंड पुकारून लष्कराने उठाव केल्यापासून म्यानमारमध्ये अराजकता पसरलेली आहे. आता हिंसक घटनाही घडू लागल्या आहेत. 

लष्कराच्या कमांडर इन चीफ कार्यालयाकडून प्रसिद्ध केलेल्या निवेदनात या हल्ला झाल्याचे सांगण्यात आले. म्यानमारमधील कोकांग या स्वप्रशासित क्षेत्रातील पूर्वीच्या मध्यवर्ती कार्यकारी समितीचे सदस्य यू खिन माउंग लविन यांच्या नेतृत्वाखाली हा ताफा जात असताना म्यानमार नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स आर्मी (एमएनडीडीए)च्या २० सदस्यांनी हा हल्ला केला. देशाची राजधानी लशिओ ते लउकाइ (कोकांगची राजधानी) या दरम्यानच्या रस्त्यावर ही घटना घडली. येथील लष्कराने सशस्त्र गटाविरोधातील कारवाईची मुदत येत्या २८ पर्यंत वाढविली असल्याचे ‘शिन्हुआ’ने सांगितले.

इंटरनेटसेवा बंद
म्यानमारमध्ये लष्कराने सत्ता हस्तगत केल्यानंतर आणि देशातील लोकशाही पुरस्कृत नेत्यांना अटक केल्याच्या घटनेनंतर येथे नागरिकांवर अनेक बंधने लादली जात आहेत. देशभरातील इंटरनेट सेवा शनिवारपासून बंद करण्यात आली.

सोशल मीडियाच्या माध्यमातून खोट्या बातम्या पसरविल्या जात असल्याचा दावा करीत लष्कराने आज ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्रॅमवर बंदी घातली. देशात इंटरनेट खंडित करण्याची ही आठवडाभरातील दुसरी आहे. म्यानमारमधील इंटरसेवेचे नियंत्रण करणारी ‘नेटब्लॉक्स’ने दिलेल्या माहितीनुसार स्थानिक वेळेनुसार आज सकाळी दहा वाजल्यापासून ही बंदी अमलात आली. यामुळे कनेक्टिव्हिटी मिळण्याचे प्रमाण नेहमीपेक्षा ५४ टक्क्यांनी घटले आहे. ऑनलाइन संपर्कात अनेक अडथळे येत आहेत.

इंटरनेट सेवापुरवठारांकडून निषेध
लष्कराच्या हा निर्णय दुःखद असल्याचे म्यानमारमधील प्रमुख इंटरनेट सेवापुरवठार ‘टेलिनॉर’ने म्हटले आहे. ‘‘लोकांचा आवाज उठविण्याचा हक्क याद्वारे हिरावून घेतला जात असून योविरोधात शेवटपर्यंत लढा देण्याची ग्वाही, ट्विटरच्या प्रवक्त्याने ‘टेक क्रंच’ या वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. या बंदीमुळे हिंद-प्रशांत भागात काही जणांना ट्विटर सुरू करण्यात अडथळे येण्याची शक्यता आहे. ही समस्या सोडविण्याचा प्रयत्न ट्विटर करीत आहे, असेही सांगण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com