
प्रेयसीचा पती अचानक घरी आल्यामुळे प्रियकराला काय करावे समजेनासे झाले. विवस्त्र अवस्थेतच तो चौथ्या मजल्यावरील खिडकीला लटकला अन् खाली पडला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
बीजिंग (चीन): प्रेयसीचा पती अचानक घरी आल्यामुळे प्रियकराला काय करावे समजेनासे झाले. विवस्त्र अवस्थेतच तो चौथ्या मजल्यावरील खिडकीला लटकला अन् खाली पडला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर 10 सेकंदाच्या व्हिडिओने धुमाकूळ घातला आहे. संबंधित व्हिडिओमध्ये एक नग्न व्यक्ती एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील खिडकीला लटकलेला दिसत आहे. अखेर तो खाली पडतो. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या व्यक्तीचे एका विवाहीत महिलेसोबत अनैतिक संबंध होते. तिला भेटण्यासाठी तो तिच्या घरी गेला होता. दोघे नको त्या अवस्थेत असताना अचानक महिलेचा पती घरी आला. त्यामुळे दोघांची पंचाईत उडाली. अखेर, प्रियकर चौथ्या मजल्यावरील खिडकीतून नग्नावस्थेत बाहेर लटकला. परंतु, पकड सैल झाल्यामुळे जमिनीवरील कचऱयाच्या डब्यावर कोसळला. जमिनीवर पडल्यामुळे तो जखमी झाला असला तरी जीव वाचला आहे.
'द सन'ने दिलेल्या वृत्तानुसार, 'संबंधित व्हिडिओ चीनमधील असून, 30 नोव्हेंबर रोजी ट्विटरवर अपलोड करण्यात आला आहे. तेव्हापासून व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.' दरम्यान, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.