Nancy Pelosi After Going : २७ चिनी लढाऊ विमानांनी तैवानच्या एअर डिफेन्स झोनमध्ये घातल्या घिरट्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

China Fighter Jets In Taiwan

Nancy Pelosi After Going : २७ चिनी लढाऊ विमानांनी तैवानच्यामध्ये घातल्या घिरट्या

China Fighter Jets In Taiwan अमेरिकन हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या अध्यक्ष नॅन्सी पेलोसी (Nancy Pelosi) तैवानमधून बाहेर पडताच तैपेई चिनी (China) लढाऊ विमानांनी (Fighter Jets) तैवानच्या सीमेत प्रवेश केला. बुधवारी २७ चिनी युद्ध विमानांनी तैवानच्या हवाई संरक्षण क्षेत्रावरून उड्डाण केले. खरं तर चीनच्या प्रचंड विरोधानंतर पेलोसी तैवानला आल्या होत्या. आता त्या परत गेल्याबरोबर चीनची युद्ध विमाने तैवानच्या सीमेवर घिरट्या घालू लागली आहे.

चीन स्व-शासित बेटाला आपला भाग मानतो. ‘२७ पीएलए विमाने ३ ऑगस्ट २०२२ रोजी चीन प्रजासत्ताकाच्या परिसरात दाखल झाली’ असे बुधवारी तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने ट्विटमध्ये म्हटले आहे. यापूर्वी, तैवानला भेट दिलेल्या अमेरिकन शिष्टमंडळाने सांगितले होते की, अमेरिका स्व-शासित बेटावरील वचनबद्धतेपासून मागे हटणार नाही.

हेही वाचा: Money Laundering Act : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय भयानक - विरोधी पक्ष

पेलोसी (Nancy Pelosi) या गेल्या २५ वर्षांत तैवानला भेट देणाऱ्या यूएस हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या पहिल्या स्पीकर आहे. तैवानला आपला भूभाग असल्याचा दावा करणाऱ्या चीनने (China) या बेटाच्या जवळपास अनेक लष्करी सराव जाहीर केले आणि अनेक कठोर विधाने जारी केली आहे.

चीनने मंगळवारी मुत्सद्दी पातळीवर नॅन्सी पेलोसी यांच्या भेटीचा निषेध नोंदवला आणि म्हटले की पेलोसीची भेट एक चीन तत्त्वाचे उल्लंघन करते. चीनला नियंत्रित करण्यासाठी अमेरिकेने तैवान कार्ड खेळल्याचा आरोप चीनने केला होता. याआधी पेलोसी म्हणाल्या की, तैवानला भेट देणारे अमेरिकन शिष्टमंडळ एक संदेश पाठवत आहे. अमेरिका स्व-शासित बेटावरील वचनबद्धतेपासून मागे हटणार नाही.

हेही वाचा: Sanjay Raut Interview Viral : अटकेपूर्वी मोदींपासून फडणवीसांचे कौतुक; वाचा...

अमेरिकेची वचनबद्धता अढळ

आज जगासमोर लोकशाही आणि निरंकुशता यापैकी एक निवडण्याचे आव्हान आहे. तैवान आणि जगभरातील सर्वत्र लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी अमेरिकेची वचनबद्धता अढळ आहे, असे तैवानच्या राष्ट्रपती त्साई इंग-वेन यांच्याशी भेट घेतल्यानंतर संक्षिप्त निवेदनात पेलोसी म्हणाल्या.

Web Title: Nancy Pelosi China Fighter Jets Taiwan Defense Zone

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..