भारतातील 'या' उद्योगपतींचे जावई इंग्लंडचे नवे अर्थमंत्री

वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

  • नारायण मूर्तींचे जावई रिशी सुनक इंग्लंडचे नवे अर्थमंत्री

लंडन : ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भारतीय वंशाचे रिशी सुनक यांची इंग्लंडच्या अर्थमंत्रीपदी नियुक्ती केली आहे. मंत्रिमंडळाची पुनर्रचना करताना ब्रिटिश पंतप्रधानांनी हा निर्णय घेतला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सुनक हे प्रसिद्ध उद्योगपती आणि इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. याचबरोबर इंग्लंडच्या गृहसचिव प्रीती पटेल यांच्याबरोबर सुनक यांची चॅन्सलर म्हणून इंग्लंड सरकारच्या विशेष बेंचमध्ये नियुक्ती होणार आहे. याआधी पाकिस्तानी वंशाचे साजिद जाविद यांनी तडकाफडकी चॅन्सलरपदाचा राजीनामा दिला होता. 

Image result for narayan murthy and sudha murthy

डिसेंबर 2019 मध्ये सर्वसाधारण निवडणुकांमध्ये दणदणीत बहुमत मिळवणाऱ्या जॉन्सन यांना जाविद यांच्या राजीनाम्याने धक्का बसला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narayana Murthys son in law Rishi Sunak named new finance minister of UK