‘टाईम’च्या 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत मोदी आणि पेटीएमचे संस्थापक

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पेटीएम चे संस्थापक विजय शंकर शर्मा टाइम मासिकाच्या जगातील सर्वात प्रभावशाली 100 व्यक्तींच्या यादीत समावेश झाला आहे. या यादीत फक्त दोन भारतीयांचा समावेश करण्यात आला आहे.

न्यूयॉर्क- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पेटीएम चे संस्थापक विजय शंकर शर्मा टाइम मासिकाच्या जगातील सर्वात प्रभावशाली 100 व्यक्तींच्या यादीत समावेश झाला आहे. या यादीत फक्त दोन भारतीयांचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन व ब्रिटीश पंतप्रधान टेरेजा मे यांचाही समावेश आहे. टाइम मासिकाच्या यादीत जगभरातील कलाकार, नेते व महत्त्वाच्या व्यक्तींचा समावेश करण्यात येतो.

मासिकामध्ये प्रसिद्ध लेखक पंकज मिश्रा यांनी मोदींची माहीती लिहीली असून त्यांनी म्हटले आहे की, डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष बनण्याआधी नरेंद्र मोदी जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे पंतप्रधान बनले होते. या लेखात नरेंद्र मोदींचे गुणगान गाण्यात आले असुन असे म्हटले आहे की मुस्लीमविरोधी हिंसेत त्यांचा सहभाग असल्याच्या आरोपावरुन अमेरिकेने त्यांच्यावर बंदी घातली होती व राजकीय दृष्ट्या त्यांच्यावर बहिष्कार टाकला होता परंतु नरेंद्र मोदींनी ट्विटर सारख्या माध्यमाचा वापर करुन लोकांशी संवाद साधला व मने जिंकली.

नोटबंदीनंतर पोटीएम ची भरभराट

या मासिकात इन्फोसिसचे संचालक नंदन नीलेकणी यांनी पेटीएम चे संस्थापक विजय शंकर शर्मा यांच्याबद्दल लिहीले आहे की भारत सरकारने नोटबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर पेटीएमने त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थीतीचा फायदा घेतला. नोटबंदीनंतर ग्राहकांना त्यांनी आपल्याकडे आकर्षून घेतले. नीलेकणी यांनी लिहीले आहे की 2016 वर्षाच्या सुरवातीला 12.2 कोटी असलेला पेटीएम युजर्सचा आकडा वर्षाच्या 17.7 कोटी पर्यंत गेला होता.

गेल्या वर्षी टाइमच्या प्रभावशाली 100 लोकांच्या यादीत रघुराम राजन, सानिया मिर्झा, प्रियंका चोप्रा, गूगलचे सीईओ सुंदर पिचाई व फ्लिपकार्टचे संस्थापक बिन्नी बंसल व सचिन बंसल यांचा समावेश होता.

या व्यक्तींचा आहे समावेश
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, त्यांची पत्नी इवांका ट्रम्प, पोप फ्रांसिस, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि उत्तर कोरीया चे प्रमुख किम जोंग उन यांचा समावेश आहे.

Web Title: Narendra Modi, Paytm's founder in Time magazine's 'most influential people list