esakal | मोदींच्या भाषणावेळी डिस्लाईकचे बटन गायब; वाचा देश-विदेशच्या महत्त्वाच्या 7 बातम्या
sakal

बोलून बातमी शोधा

esakal1

देश-विदेशच्या महत्वाच्या बातम्या येथे वाचा

मोदींच्या भाषणावेळी डिस्लाईकचे बटन गायब; वाचा देश-विदेशच्या महत्त्वाच्या 7 बातम्या

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित केले. यावेळी भाषणावरून त्यांना डिस्लाईक करण्यात येण्याची शक्यता लक्षात घेऊन भाजपच्या यू ट्यूबवरून डिस्लाईकचे बटन हटविण्यात आले. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री असलेल्या कोश्यारी यांना आता उत्तराखंड उच्च न्यायालयाने नोटीस पाठवली असून चार आठवड्यांच्या आत उत्तर देण्यास सांगितलं आहे. कोरोनामुळे त्रस्त असलेल्या अमेरिकेला आता सुनामीचा धोका आहे. अलास्काच्या किनाऱ्यावर सोमवारी 7.5 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला.

PM Modi Speech:लॉकडाऊन संपला, कोरोना नाही; पंतप्रधान मोदींनी दिली काळजी घेण्याचा सल्ला 

गेल्या आठ महिन्यांपासून देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आला आहे. या लॉकडाऊनचे नियम जुलै महिन्यापासून शिथिल करण्यात येत आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित केले. 19 मार्चला मोदींनी जनता कर्फ्यूची घोषणा केली होती. त्यानंतर जनता कर्फ्यूपासून आतापर्यंत पंतप्रधान मोदींनी देशाला 7 वेळा संबोधित केलं आहे. सविस्तर बातमी-

पंतप्रधान मोदींचे भाषण फ्लॉप; भाजपने डिस्लाईक बटण केले ब्लॉक! 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित केले. दसरा-दिवाळीच्या तोंडावर पंतप्रधान मोदी कोणती घोषणा करतात की काय? अशी अपेक्षा असताना, केवळ कोरोना संदर्भात निष्काळजीपणा करू नका, असा संदेश देऊन पंतप्रधान मोदींचे भाषण संपले. दर वेळी मोदींचे भाषण किमान 20 ते 25 मिनिटांचे असते. पण, आजचा संदेश केवळ पाच मिनिटांत संपला. परंतु, मोदींच्या या भाषणावरून त्यांना डिस्लाईक करण्यात येण्याची शक्यता लक्षात घेऊन भाजपच्या यू ट्यूबवरून डिस्लाईकचे बटन हटविण्यात आले. सविस्तर बातमी-

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना अवमान प्रकरणी उच्च न्यायालयाची नोटीस

महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी राज्याच्या विधानसभा निवडणुकीपासून सातत्याने या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत राहिले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरून वाद निर्माण झाला होता. आता पुन्हा एकदा भगत सिंह कोश्यारी यांचे नाव चर्चेत आलं आहे. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री असलेल्या कोश्यारी यांना आता उत्तराखंड उच्च न्यायालयाने नोटीस पाठवली असून चार आठवड्यांच्या आत उत्तर देण्यास सांगितलं आहे. सविस्तर बातमी-

'असल्या भाषेचं आजिबात समर्थन करू नका'; राहुल गांधी कमलनाथांवर गरजले

कमलनाथजी आमच्या पक्षातील आहेत. पण, त्यांनी जी भाषा वापरली ती मला आवडली नाही. ते कोणीही असले तरी, मी त्याचे समर्थन करणार नाही. त्यांचे वक्तव्य दुर्दैवी होते, असं राहुल गांधी म्हणाले आहेत. कमलनाथ यांच्या वक्तव्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधकांनी कमलनाथ आणि काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. सविस्तर बातमी-

कोरोनावरील संशोधन आणि उत्पादनात भारताची कामगिरी प्रेरणादायी- बिल गेट्स

ख्यात उद्योगपती आणि मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी पुन्हा एकदा कोरोना विषाणूविरोधातील लढाईसाठी भारताच्या योगदानाचे कौतुक केले आहे. भारताचे संशोधन आणि उत्पादनाची क्षमता कोरोनाविरोधातील लढाईसाठी खूप महत्त्वाची आहे. सविस्तर बातमी-

दोन अतिरेक्यांचा खात्मा; शोपियांमधील सर्च ऑपरेशन यशस्वी

सोमवारी दुपारपासून जम्मू आणि काश्मिरमधील शोपियां जिल्ह्यात अतिरेक्यांचे सर्च ऑपरेशन सुरु  होतं. या सर्च ऑपरेशनमध्ये आतापर्यंत दोन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला आहे, अशी माहिती भारतीय लष्कराच्या प्रवक्त्यांनी आज मंगळवारी दिली आहे. ही मोहीम भारतीय सैन्य आणि सीआरपीएफच्या जवानांनी एकत्रितपणे राबवली आहे. ऑपरेशन अंतर्गत आज दुसरा अतिरेकी मारला गेला आहे. सविस्तर बातमी-

अमेरिकाः अलास्काच्या किनाऱ्याला 7.5 रिश्टर स्केलचा भूकंपाचा तीव्र धक्का, सुनामीचा इशारा

कोरोनामुळे त्रस्त असलेल्या अमेरिकेला आता सुनामीचा धोका आहे. अलास्काच्या किनाऱ्यावर सोमवारी 7.5 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला. त्यानंतर प्रशासनाने सुनामीचा इशारा जारी केला आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू शहरापासून 94 किमी दूर होता. सविस्तर बातमी-

Corona: WHO प्रमुखांनी हिंदीमध्ये ट्विट करत भारताचे मानले आभार; वाचा कारण

जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4 कोटींच्या पुढे गेली आहे. अशा परिस्थितीत जगभरात कोरोना विषाणूवरील औषध आणि लस तयार करण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरु आहे. यात जागतिक आरोग्य संघटना (WHO) महत्वाची भूमिका बजावताना दिसत आहे. डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस एडनम यांनी हिंदीमध्ये ट्विट करत भारत आणि साऊथ आफ्रीकेचे आभार मानले आहेत. सविस्तर बातमी-