Artemis 1 Launch: NASA चे सर्वात शक्तिशाली रॉकेट आज अवकाशात घेणार झेप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Artemis 1 Launch: NASA चे सर्वात शक्तिशाली रॉकेट आज अवकाशात घेणार झेप

Artemis 1 Launch: NASA चे सर्वात शक्तिशाली रॉकेट आज अवकाशात घेणार झेप

NASA चे सर्वात शक्तिशाली Artemis 1 हे रॉकेट प्रक्षेपणासाठी सज्ज झाले आहे. केप कॅनवेरल लॉन्च कॉम्प्लेक्स येथून ओरियन अंतराळयान प्रक्षेपित केले जाणार आहे. मानवाला चंद्रावर पाठवण्यापूर्वी नासाचे हे प्रथम चाचणी उड्डाण असेल, ज्यामध्ये एकही अंतराळवीर जाणार नाही. मानवाला चंद्रावर पाठवण्यापूर्वी ही एक टेस्ट घेण्यात येणार आहे. सध्या त्यात एकही वैज्ञानिक जाणार नाही. ओरियनमध्ये मानवांच्या जागी पुतळे पाठवले जाणार आहेत.

पुतळ्यांसोबत एक स्नूपी सॉफ्ट टॉय देखील पाठवला जात आहे, जे शून्य गुरुत्वाकर्षण निर्देशक म्हणून काम करेल. ओरियन चंद्राभोवती 42 दिवसांचा प्रवास करेल.

नासाचे शास्त्रज्ञ या अवकाशयानाद्वारे विविध प्रयोग करणार आहेत. बायोएक्सपेरिमेंट-1 हा चार प्रयोगांचा एक सेट आहे, जो चंद्र आणि मंगळावर मानव पाठवण्यापूर्वी अवकाशातील किरणोत्सर्गाच्या परिणामांचा अभ्यास करेल.त्याचबरोबार अंतराळ स्थानकावर डॉक न करता दीर्घकाळ अंतराळात राहणारे ओरियन हे पहिले अंतराळयान असेल. ते ऑक्टोबरमध्ये पृथ्वीवर परतेल. हे यान चंद्राच्या जवळ जाण्यासाठी 60,000 किमी प्रवास करेल, तेथे 42 दिवसांचा कालावधी असेल आणि पृथ्वीवर परत येईल.

हेही वाचा: NASA पुन्हा पाठवणार चंद्रावर माणूस; 29 ऑगस्टला होणार उड्डाण

ही मोहीम यशस्वी झाल्यास 2025 च्या अखेरीस महिला आणि दोन अंतराळवीर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरतील. दुसरे चाचणी उड्डाण आर्टेमिस II, मे 2024 मध्ये नियोजित असेल, यावेळी डमी अंतराळवीर अवकाशयानाद्वारे पाठवले जात आहेत.

मानवाला चंद्रावर पाठवण्यापूर्वी ही एक टेस्ट आहे. सध्या त्यात एकही वैज्ञानिक जाणार नाही. ओरियनमध्ये मानवांच्या जागी पुतळे ठेवले जात आहेत. यावेळी नासा स्पेससूट आणि रेडिएशन लेवलेचे मूल्यांकन करेल. पुतळ्यांसोबत एक स्नूपी सॉफ्ट टॉय देखील पाठवला जात आहे, जे शून्य गुरुत्वाकर्षण निर्देशक म्हणून काम करेल. ओरियन चंद्राभोवती 42 दिवसांचा प्रवास करेल.

हेही वाचा: पृथ्वीसारख्या दिसणाऱ्या 'या' ग्रहावर उगवतात चक्क दोन सूर्य! नासाचा नवा शोध

Web Title: Nasa Artemis 1 Moon Mission Is Set To Launch Ask97

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NASA