चला... पृथ्वीबाहेर फिरायला जाऊ; एक रात्र 35 हजार डॉलरची 

चला... पृथ्वीबाहेर फिरायला जाऊ; एक रात्र 35 हजार डॉलरची 

न्यूयॉर्क : पर्यटन म्हटले, की सर्वसामान्यपणे आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ते जंगल सफारी, समुद्र किनारे, ऐतिहासिक वास्तूंचे टिपिकल लोकेशन्स, पण भविष्यामध्ये मात्र हे चित्र बदलणार आहे. कारण अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था "नासा' लवकरच स्पेस टुरिझम अर्थात अंतराळ पर्यटनाचे नावे द्वार खुले करणार आहे. 
"नासा'ने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा अधिक व्यावसायिकदृष्टीने वापर करण्याचा निर्धार केला असून भविष्यामध्ये हे स्थानक खासगी पर्यटन मोहिमांचे एक महत्त्वाचे केंद्र बनणार आहे. 

हौशी पर्यटकांना अंतराळ स्थानकावर एक रात्र व्यतीत करण्यासाठी 35 हजार अमेरिकी डॉलर मोजावे लागतील. आता नासा प्रथमच अंतराळ स्थानकाचा व्यावसायिकदृष्टीने अधिक प्रभावीपणे वापर करण्याच्या विचारात असून त्याचे मार्केटिंगदेखील तितक्‍याच ताकदीने केले जाणार असल्याचे "नासा'चे मुख्य वित्तीय अधिकारी जेफ डेवीट यांनी सांगितले. 

कंपन्याच बिल ठरविणार 
नव्या अंतराळ पर्यटन मोहिमेमध्ये अंतराळ स्थानकावरील तीस दिवसांच्या वास्तव्याचा समावेश असून दरवर्षी डझनावारी अंतराळवीर या स्थानकाला भेट देऊ शकतील, असे "नासा'कडून सांगण्यात आले. खास या मोहिमेसाठी पृथ्वीच्या कक्षेमध्ये मानवाला घेऊन जाणाऱ्या अंतराळ यानाची निर्मिती केली जात असून, यामध्ये "स्पेस एक्‍स' कंपनीच्या "क्रु ड्रॅगन कॅप्सूल' आणि "बोईंग'च्या "स्टारलाइनर'चा समावेश आहे. उपरोक्त कंपन्या याच पर्यटकांची निवड करणार असून, त्याच या मोहिमेचे बिलदेखील निर्धारित करतील. या सगळ्या ट्रीपसाठीचा खर्च हा 5 कोटी 80 लाख एवढा असल्यान ते जगातील महागडे पर्यटन ठरणार आहे. हे एवढे बिल पर्यटकांना अंतराळ स्थानकावर नेण्यासाठी आकारले जाणार असून ते संबंधित खासगी कंपनी "नासा'ला देऊ करेल. 

महागडी ट्रीप 
पर्यटकांना मात्र अंतराळ स्थानकावरील वास्तव्याबरोबरच पाणी, भोजन आणि जीवरक्षक प्रणालीच्या वापरासाठी वेगळे पैसे खर्च करावे लागतील. यामुळे प्रतिरात्र एका अंतराळविराला 35 हजार डॉलर एवढा खर्च येईल, असे डेविट यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे ज्या अंतराळस्थानकाचा यासाठी वापर केला जाणार आहे ते "नासा'च्या मालकीचे नाही. अमेरिका आणि रशियाच्या सहकार्याने 1998 मध्ये ते उभारण्यात आले होते, अन्य देशांनी या संदर्भातील मोहिमांमध्ये सहभाग घेत अंतराळविरांना अवकाशात पाठविले होते. अमेरिकेतील उद्योजक डेनिस टिटो हे 2001 मध्ये जगातील पहिले अंतराळ पर्यटक ठरले होते, त्यांनी त्यांच्या स्पेस ट्रीपवर दोन कोटी डॉलर खर्च केले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com