अस्तानातील परिषदेला शरीफ उपस्थित राहणार

वृत्तसंस्था
बुधवार, 7 जून 2017

इस्लामाबाद - कझाकिस्तानातील अस्ताना येथे उद्यापासून (ता. 8) सुरू होत असलेल्या शांघाई सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले. या परिषदेवेळी पाकिस्तान आणि भारताला "एससीओ'चे पूर्ण सदस्यत्व देण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन देशांसाठी ही परिषद महत्त्वाची मानली जाते.

शांघाई सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांच्या प्रमुखांची ही 17 वी बैठक असून, ती कझाकिस्तानातील अस्ताना येथे 8 व 9 जून रोजी होत आहे. या परिषदेवेळी पाकिस्तान आणि भारताला संघटनेचे पूर्ण सदस्यत्व देण्यात येणार आहे. अस्तानातील परिषदेमध्ये संघटनेचे पाकिस्तानला पूर्ण सदस्यत्व दिले जाणार असल्याची माहिती पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने आज दिली. पाकिस्तानला हा दर्जा देण्याचा निर्णय संघटनेच्या रशियातील 2015मध्ये झालेल्या बैठकीवेळी घेण्यात आला होता. आत्तापर्यंत पाकिस्तानला "एससीओ'मध्ये निरीक्षक देशाचा दर्जा होता. या परिषदेवेळी भारताला पूर्ण सदस्यत्व दिले जाणार आहे. भारताचे पंप्रधान नरेंद्र मोदी हे या परिषदेला हजेरी लावण्याची शक्‍यता आहे; मात्र ते शरीफ यांना भेटणार नाहीत, असे भारताकडून यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: navaz sharif international news marathi news pakistan