नवज्योतसिंह सिद्धू जाणार पाकिस्तानात?

वृत्तसंस्था
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

पंजाबचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू यांना कर्तारपूर कॉरिडोर उद्घाटन सोहळ्यासाठी पाकिस्तानकडून आमंत्रण पाठविण्यात आले आहे. त्यानंतर आता नवज्योतसिंग सिद्धू हे या कर्तारपूर कॉरिडोर उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

नवी दिल्ली : पंजाबचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू यांना कर्तारपूर कॉरिडोर उद्घाटन सोहळ्यासाठी पाकिस्तानकडून आमंत्रण पाठविण्यात आले आहे. त्यानंतर आता नवज्योतसिंग सिद्धू हे या कर्तारपूर कॉरिडोर उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी त्यांनी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना पत्र लिहून पाकिस्तानला जाण्यासाठी परवानगी मागितली आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान 'तेहरीक-ए-इन्साफ'च्या (पीटीआय) वतीने नवज्योतसिंग सिद्धू यांना कर्तारपूर कॉरिडोर उद्घाटन सोहळ्यात सामील होण्यासाठी आमंत्रण देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर इम्रान खान यांच्या आदेशानुसार पाकिस्तानचे खासदार फैसल जावेद यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांच्याशी फोनवरून संवाद साधला असून, 9 नोव्हेंबरला या सोहळ्यात उपस्थित होण्याचे आमंत्रण दिले आहे. 

दरम्यान, कर्तारपूर कॉरिडोर 9 नोव्हेंबरला खुला करण्यात येणार आहे. या विशेष कॉरिडोरने कर्तारपूर येथील दरबार साहिब आणि पंजाबच्या गुरुदासपूर जिल्ह्यातील बाबा नानक गुरुद्वाराला जोडले जाणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navjot Singh Sidhu asks MEA for permission to visit Pakistan for Kartarpur Corridor opening ceremony