नवाज शरीफ, अब्बासींची लाहोर न्यायालयात हजेरी 

पीटीआय
मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018

लाहोर (पीटीआय) : मुंबईवर 2008मध्ये झालेल्या दहशतवादी हल्लाप्रकरणी लाहोर उच्च न्यायालयात देशद्रोहाचा खटला सुरू आहे. या खटल्याच्या सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि शाहीद खकान अब्बासी यांच्यासह वरिष्ठ पत्रकार व डॉन वृत्तपत्राचे सहायक संपादक सिरील अल्मेडा हे उपस्थित होते. 

या प्रकरणाच्या मागच्या सुनावणीवेळी अल्मेडा यांचे नाव पाकिस्तानातून बाहेर जाण्यास बंदी असलेल्यांच्या यादीत समाविष्ट करण्याचा आदेश देण्यात आला होता. तसेच, सुनावणीला अनुपस्थित राहिल्याबद्दल त्यांच्या विरोधात अजामिनपात्र वॉरंट बजावण्यात आले होते. एका मुलाखतीद्वारे मुंबईवरील 26/11च्या दहशवादी हल्लाप्रकरणी अतिशय गोपनीय माहिती माध्यमांना दिल्याबद्दल शरीफ यांच्या विरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला आहे. तसेच, शरीफ यांच्या भूमिकेला पाठिंबा देत गोपनीय बैठकीतील माहिती उघड केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणाची सुनावणी न्यायालयाने 22 ऑक्‍टोबरपर्यंत स्थगित केली आहे. लाहोर उच्च न्यायालयाच्या तीन सदस्यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nawaz Sharif Abbasi appearance in Lahore court