पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाची नवाज शरीफ यांना नोटीस

पीटीआय
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016

पनामा पेपर्स लीक प्रकरण; 450 जणांचा समावेश
इस्लामाबाद - पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने आज पनामा पेपर्स लीक प्रकरणात पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नोटीस बजावली. भ्रष्टाचाराचे आरोप आणि परदेशात बेकायदा पद्धतीने संपत्ती जमा केल्यावरून शरीफ यांना अपात्र ठरविण्यासंबंधीच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने नोटीस जारी केली.

न्यायालयाने अनेक याचिकांवर सुनावणी केली. यामध्ये इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफच्या याचिकेचाही समावेश आहे. या याचिकांमध्ये शरीफ आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर बेकायदा पद्धतीने संपत्ती विदेशात पाठविल्यासंबंधीचा आरोप पनामा पेपर्स लीकमध्ये करण्यात आला होता.

शरीफ यांच्याशिवाय त्यांची मुलगी मरीयम, मुले हसन आणि हुसैन, जावई महंम्मद सफदर, अर्थमंत्री इशाक दार, केंद्रीय तपास पथकाचे महासंचालक, फेडरल ब्युरो ऑफ रेव्हेन्यूचे अध्यक्ष आणि अटर्नी जनरल यांच्यासह सुमारे 450 जणांविरूद्ध नोटीस जारी करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठात मुख्य न्यायाधीश अन्वर झहीर जमाली, न्यायाधीश इजाजुल अहसन आणि न्यायाधीश खिलजी आरिफ हुसैन यांचा समावेश आहे. खंडपीठाने प्राथमिक सुनावणीनंतर हे प्रकरण दोन आठवड्यांसाठी स्थगित केले.

नवाज शरीफ एखाद्या राजाप्रमाणे वर्तन करत आहेत. मात्र, हे वागणे त्यांना कायद्याच्या जाळ्यात अडकवेल.
- इम्रान खान, पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफचे अध्यक्ष

Web Title: nawaz sharif notice by pakistan ssupreme court