नवाज शरीफसह कन्या, जावयावर आरोप निश्‍चित

पीटीआय
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

परदेशात संशयित कंपन्यांच्या नावावर मालमत्ता ठेवण्यासंबंधी प्रकरण समोर आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयान्या आदेशानुसार नॅशनल अकाउंटीबिलिटी न्यायालयाने शरीफ कुटुंबांला आरोपी केले होते. मात्र, भ्रष्टाचाराच्या आरोपातून मुक्त करण्यासाठी आणि कार्यवाही थांबवण्यासाठी शरीफ कुटुंबांनी केलेली याचिका फेटाळून लावत न्यायालयाने भ्रष्टाचारासंबंधी ठेवण्यात आलेले आरोप निचित केले

इस्लामाबाद - पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ, कन्या मरियम आणि त्यांचे जावई मोहंमद सफदर यांच्यावर आज इस्लामाबादच्या भ्रष्टाचारविरोधी न्यायालयाने लंडन येथील मालमत्ता आणि गैरव्यवहारप्रकरणी सुरू असलेल्या खटल्यातील आरोप निश्‍चित केले. शरीफ कुटुंबाविरुद्ध लंडन येथील त्यांची एवेनफील्ड मालमत्ता, अजिजिया स्टील मिल्स आणि त्याचबरोबर 16 अन्य परकी कंपन्यासंबंधी चार प्रकरणात भ्रष्टाचाराचे आरोप ठेवले आहेत.

परदेशात संशयित कंपन्यांच्या नावावर मालमत्ता ठेवण्यासंबंधी प्रकरण समोर आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयान्या आदेशानुसार नॅशनल अकाउंटीबिलिटी न्यायालयाने शरीफ कुटुंबांला आरोपी केले होते. मात्र, भ्रष्टाचाराच्या आरोपातून मुक्त करण्यासाठी आणि कार्यवाही थांबवण्यासाठी शरीफ कुटुंबांनी केलेली याचिका फेटाळून लावत न्यायालयाने भ्रष्टाचारासंबंधी ठेवण्यात आलेले आरोप निचित केले.

न्यायालयाच्या मते, शरीफ, त्यांची मुलगी आणि जावई प्रथमदर्शनी आरोपी असल्याचे आढळून आले आहे. आजच्या सुनावणीसाठी मरियम आणि त्यांचे पती न्यायालयात हजर होते. त्याचवेळी नवाज शरीफ यांनी आपली हजेरी नोंदवण्यासाठी प्रतिनिधीला पाठवले होते. शरीफ यांची पत्नी आजारी असल्याने आणि तिच्यावर उपचार सुरू असल्याने ते हजर राहिले नसल्याचे सांगितले जात आहे.

Web Title: nawaz sharif pakistan corruption