#ManOnMoon50th : या तीन दिग्गजांनी यशस्वी केली पहिली चांद्रमोहिम!

अमित गोळवलकर
शुक्रवार, 19 जुलै 2019

चांद्रमोहिमेत नील ए. आर्मस्ट्राँग, बझ आल्ड्रिन आणि मायकेल काॅलिन्स सहभागी होते. चांद्रमोहिमेनंतर त्यांचे खूप कौतुक झाले. पण त्यानंत त्यांच्या जीवनात काय घडले? जाणून घ्या... 

20 जुलै 1969 मध्ये चंद्रावर मानवाने पहिले पाऊल ठेवले. या चांद्रमोहिमेत नील ए. आर्मस्ट्राँग, बझ आल्ड्रिन आणि मायकेल काॅलिन्स सहभागी होते. चांद्रमोहिमेनंतर त्यांचे खूप कौतुक झाले. पण त्यानंत त्यांच्या जीवनात काय घडले? जाणून घ्या... 

नील ए. आर्मस्ट्राँग 

20 जुलै, 1969 रोजी चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव. त्याने आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धापर्यंत कधीही आपले आत्मचरित्र लिहिले नाही. चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव म्हणून आयुष्यभर आर्मस्ट्राँग कार्यक्रमांमध्ये मिरवू शकले असते. आपले आत्मचरित्र लिहावेसे त्यांना कधीच वाटत नव्हते. मात्र, अभ्यासक व लेखक जेम्स हॅन्सेन यांनी खूप पाठपुरावा केल्यानंतर आर्मस्ट्राँग यांनी आपले चरित्र लिहिण्याची परवानगी हॅन्सेन यांना दिली. या चरित्राची प्रक्रिया 1999 च्या आॅक्टोबरमध्ये सुरु झाली. हॅन्सेन यांनी पहिल्यावेळी जेव्हा आर्मस्ट्राँग यांना पत्र लिहिले तेव्हा आपल्याला वेळ नाही सांगत आर्मस्ट्राँग यांनी त्यांना टाळले. पण हॅन्सेन यांनी आपण लिहिलेली पुस्तके आर्मस्ट्राँग यांना पाठवण्याचा सपाटा सुरु ठेवला. त्यातले एक पुस्तक आर्मस्ट्राँग यांना आवडले आणि मग त्यांनी हॅन्सेन यांना आपले चरित्र लिहिण्याची परवानगी दिली. त्यापूर्वी ही मोहिम व आर्मस्ट्राँग यांचे जीवन याच्यावर अनेक लेखकांनी लिहिले होते. मात्र, हॅन्सेन यांनी लिहिलेले हे पुस्तक चंद्रावर पाऊल ठेवणाऱ्या पहिल्या मानवाचे अधिकृत चरित्र ठरले. नील आर्मस्ट्राँग यांच्या या चरित्राचे नाव आहे 'फर्स्ट मॅन : द लाईफ आॅफ नील ए. आर्मस्ट्राँग'.

Image may contain: text

बझ आल्ड्रिन

अपोलो 11 मोहिमेद्वारे चंद्रावर पाऊल ठेवणारा दुसरा मानव. चंद्राच्या पृष्ठभागाची जी छायाचित्रे आज प्रसिद्ध आहेत त्यापैकी बहुतांश छायाचित्रे बझ आल्ड्रिन यांनी काढलेली आहेत. चंद्रावर पहिले पाऊल ठेवण्याचा मान आल्ड्रिन यांना मिळाला नसला तरी चंद्रावर धार्मिक विधी करणारी पहिली व्यक्ती ही बझ आल्ड्रिन हीच आहे. 'कम्युनियन' असे या विधीचे नाव आहे. चंद्रावर शिंपडले गेलेले पहिले पाणी आणि सेवन केलेल्या अन्नाचा पहिला घास हा या कम्युनियनचा प्रसाद होता, असे बझ आल्ड्रिन यांनी नंतर सांगितले. अर्थात अनेक वर्षे आपण हा विधी केल्याचे आल्ड्रिन यांनी कुणाला सांगितले नव्हते. आपल्याला चंद्रावर पहिले पाऊल ठेवण्याचा मान मिळणार नाही, हे मोहिमेच्या सुरुवातीपासून आल्ड्रिन यांना माहित होते. ही खंत त्यांच्या मनात अखेरपर्यंत राहिली. हे सारे त्यांनी उतरवले आहे आपल्या आत्मचरित्रात... या आत्मचरित्राचे नाव आहे, 'द मॅग्निफिशण्ट डिसोलेशन- द लाँग जर्नी होम फ्राॅम द मून'

Image may contain: one or more people and text

मायकेल काॅलिन्स 
चंद्रावर पाऊल ठेवणारे म्हणून नील आर्मस्ट्राँग आणि बझ आल्ड्रिन यांची नावे घेतली जातात. पण चंद्राच्या जवळ जाऊनही त्यावर पाऊल ठेऊ न शकलेली व्यक्ती होती मायकेल काॅलिन्स. अपोलो 11 या मोहिमेचे कमांड मोड्युल पायलट. जेमिनी 10 त्यांची पहिली अंतराळ यात्रा. त्यानंतर अपोलो 11 मोहिमेसाठी मायकेल काॅलिन्स यांची निवड झाली. ज्यावेळी नील आर्मस्ट्राँग आणि बझ आल्ड्रीन अपोलो ११ मधून बाहेर पडले त्यावेळी मायकेल काॅलिन्स चंद्राच्या कक्षेभोवती चांद्रयानातून घिरट्या घालत होते. त्यांना स्वतःला चंद्रावर पाऊल ठेवण्याची संधी मिळाली नाही. मात्र, त्याबाबतची खंत त्याने कधी व्यक्त केली नाही. कारण आपल्यावर सोपवलेली जबाबदारी ते चोखपणे पार पाडत होते. आर्मस्ट्राँग आणि काॅलिन्स २१ तास ३१ मिनिटे चंद्राच्या पृष्ठभागावर होते. हा सगळा वेळ तो चांद्रयान कक्षेत ठेवत परतीच्या प्रवासाची वाट पहात होते. 
एक अंतराळवीर म्हणून त्यांनी आपला प्रवास रेखाटला आहे 'फ्लाईंग टू द मून - ऑन अॅस्ट्राॅनाॅटस् स्टोरी' या आत्मचरित्रात्मक पुस्तकात

Image may contain: text


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: neil armstrong buzz aldrin michael collins are the astronauts who success Apollo 11