#NelsonMandela : नेल्सन मंडेलांविषयी जाणून घ्या या 'पाच' खास गोष्टी !

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

Nelson Mandela death anniversary : दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांची आज पुण्यतिथी आहे. वर्णविरोधी लढ्याचे अग्रणी नेल्सन मंडेला यांचे जीवन संर्घषमय होते.

मुंबई : वर्णभेदाच्या इतिहासातला आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. वर्णभेदाविरोधात आपलं आयुष्य अर्पण केलेल्या आणि दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांची आज पुण्यतिथी आहे. वर्णविरोधी लढ्याचे अग्रणी नेल्सन मंडेला यांचे जीवन संघर्षमय होते. पुण्यतिथीनिमित्त नेल्सन यांच्या प्रेरणादायी संघर्षाविषयी जाणून घ्या काही खास गोष्टी. 

रंगभेदाच्या विरोधात बंड पुकारण्याऱ्या नेल्सन यांचा 18 जुलै 1918 ला त्यांचा जन्म झाला. वयाच्या 95 व्या वर्षी आजच्या म्हणजे 5 डिसेंबर 2013 ला त्यांनी जगाचा निरोप घेतला. विशेष म्हणजे नेल्सन हे महात्मा गांधी यांचे अनुयायी होते. वर्णभेदाविरोधी लढा देत असताना महात्मा गांधी यांचा आर्दश घेत अहिंसेचा मार्ग अवलंबला. 

Image may contain: 1 person, close-up

(फोटो सौजन्य : गुगल)
'हे' आहे खरं नाव...

मंडेला यांचा जन्म झाल्यावर रोलीह्लला मंडेला (Rolihlahla Mandela) हे नाव ठेवण्यात आलं होतं. पण पुढे शाळेत शिक्षण घेत असताना एका मास्तरांनी त्यांच्या नावापुढे 'नेल्सन' जोडलं. तेव्हापासून मंडेला यांचे नाव नेल्सन होलीसाजा मंडेला असं झालं. 

तो प्रसंग ठरला आयुष्यतला टर्निंग पॉईंट
नेल्सन 9 वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. हाच प्रसंग नेल्सन यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला. 'थेम्बु' समुदायाच्या जोंगिंताबा जेलिनजायेबो यांनी नेल्सन यांना द्त्तक घेतले. आपल्या छोट्याश्या गावाला सोडून नेस्लन थेम्बु प्रमुखांच्या शाही घरामध्ये राहण्यास आले. त्यानंतर क्लार्कबरी बोर्डिंग इंस्टिट्यूट आणि वेजलियन कॉलेजांमध्ये शिक्षण घेण्याची संधी त्यांना मिळाली.  मंडेला त्यांच्या घरातील पहिले सदस्य ठरले ज्यांनी शिक्षण घेतलं. त्यांना क्रिकेट आणि फुटबॉल हे खेळ आवडायचे.

Image may contain: 1 person, suit

(फोटो सौजन्य : गुगल)
कॉलेजमधून बाहेर काढले कारण...
मंडेला 'यूनिवर्सिटी कॉलेज ऑफ फोर्ट हारे' मध्ये आर्ट्स (कला) विभागात शिक्षण घेत होते. विद्यार्थ्यांच्या अधिकारांसाठी ते प्रामुख्याने पुढाकार घेत असत. त्यामुळे त्यांन युनिव्हर्सिटीमधून काढण्यात आले. या सर्व प्रकारामुळे थेम्बु चीफ हे भ़डकले आणि त्यांनी मंडेला यांना कॉलेजमध्ये पुन्हा जाण्यास किंवा लग्न करण्यासाठी सांगितले. लग्नाच्या नावाने मंडेला त्यांच्या चुलत भावासोबत पळुन गेले आणि पुढील शिक्षण पूर्ण केलं. 

Image may contain: 1 person, outdoor

(फोटो सौजन्य : गुगल)
आत्मकथा
मंडेला सन 1962 ते 1990 पर्य़ंत तुरुंगात कैद होते. याच काळात त्यांनी गुप्तपणे तुरुंगातच आत्मकथा लिहिण्यास सुरुवात केली. तुरुंगात लिहिलेल्या त्यांच्या जीवनाविषयीचं पुस्तक 1994 मध्ये प्रकाशित झालं.  'लॉन्ग वॉक टू फ्रीडम' असं त्या पुस्तकाचं नाव होतं. 

दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष 
 मंडेला हे 10 मे 1994 ला दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष झाले. त्यावेळी मंडेला यांचं वय 77 वर्षे होतं. फक्त वर्णभेदाविरोधी नाही तर AIDS विषयी समाजात जागरुकता निर्माण करण्याचं कामही त्यांनी केलं. मंडेला यांच्या मुलाचं 2005 मध्ये AIDS मुळे निधन झालं होतं.

Image may contain: 1 person, smiling, close-up

(फोटो सौजन्य : गुगल)
भारत सरकारने 1990 मध्ये मंडेला यांना देशातील सर्वोच्च अशा ‘भारतरत्न’ या नागरी पुरस्काराने सन्मानित केले. त्यांना 1993मध्ये शांततेचं नोबेलही प्रदान करण्यात आलं. मंडेला यांना फुप्फुसांमध्ये संसर्ग झाला आणि मृत्यूच्या आधी अनेक महिने ते रुग्णालयात दाखल होते. मात्र शेवटच्या काही दिवसांमध्ये त्यांच्यावर राहत्या घरीच उपचार सुरु होते. अखेर 5 डिसेंबर 2013 ला त्यांचे निधन झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nelson Mandela death anniversary