नेपाळच्या पंतप्रधानांचा भारतावर आरोप

वृत्तसंस्था
सोमवार, 29 जून 2020

भारताचा भाग परस्पर व अनिकृतपणे नकाशात दर्शविण्याची खेळी करणारे नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी पुन्हा एकदा भारताला अप्रत्यक्षरीत्या लक्ष्य केले आहे. ‘एक दूतावास माझे सरकार उलथवून लावण्याचा कट हॉटेलमधून रचत आहे,’ असा आरोप भारताचे नाव न घेता त्यांनी केला.

काठमांडू - भारताचा भाग परस्पर व अनिकृतपणे नकाशात दर्शविण्याची खेळी करणारे नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी पुन्हा एकदा भारताला अप्रत्यक्षरीत्या लक्ष्य केले आहे. ‘एक दूतावास माझे सरकार उलथवून लावण्याचा कट हॉटेलमधून रचत आहे,’ असा आरोप भारताचे नाव न घेता त्यांनी केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नेपाळमधील सत्ताधारी नेपाळ कम्युनिस्ट पक्षाचे नेते मदन भंडारी यांच्या ६९व्या जयंतीच्या कार्यक्रमात बोलताना ओली यांनी हा आरोप केला. ‘मला हटविण्याची खेळी सुरू असली, तरी असे होणे असंभव आहे,’ अशी दर्पोक्तीही त्यांनी केली.

कोरोना रुग्णांची संख्या १ कोटीवर; तर मृत्यूची संख्या...

ओली म्हणाले की, काठमांडूतील हॉटेलमध्ये मला हटविण्यावर चर्चा सुरू असून, त्यात एका देशाचे दूतावास कार्यालयही सक्रिय आहे. ‘‘नेपाळच्या नकाशात भारतीय भूभाग दाखविल्याचे विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर माझ्याविरोधात कारस्थान रचले जात आहे.

प्रत्येक रविवारी होणार लॉकडाऊन; राज्य सरकारचा मोठा निर्णय

मला पदावरून हटविण्याची खुली स्पर्धाच झाली आहे,’’ असा दावा त्यांनी केला. पंतप्रधान ओली यांचा पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे. सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष पुष्पकमल दहल प्रचंड यांनी ओली यांच्यावरील टीकेनंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ओली यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला नाही, तर पक्ष सोडण्याचा इशाराही प्रचंड यांनी दिला आहे. खुर्ची वाचविण्यासाठी ओली यांनी सैन्याचा आधार घेतला आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. कम्युनिस्ट पक्षाच्या स्थायी समितीच्या बैठकीतही बहुतेक सदस्यांनी ओली यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

भ्रष्टाचाराच्या नावाखाली मला कोणीही तुरुंगात डांबू शकत नाही. सैन्याच्या मदतीने देशावर राज्य करणे सोपे नाही. 
- पुष्पकमल दहल प्रचंड 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nepals PM accuses India