ड्रग्ज बाळगणाऱ्या नेस वाडियांना जपानमध्ये तुरूंगवास

मंगळवार, 30 एप्रिल 2019

किंग्ज इलेव्हन पंजाबचे सहमालक नेस वाडिया यांना अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी जपानमध्ये दोन वर्षांसाठी तुरुंगवास ठोठाविण्यात आला आहे. 

टोकियो : किंग्ज इलेव्हन पंजाबचे सहमालक नेस वाडिया यांना अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी जपानमध्ये दोन वर्षांसाठी तुरुंगवास ठोठाविण्यात आला आहे. 

नुसली वाडिया यांचे जेष्ठ पुत्र आणि 283 वर्ष जुन्या असेलेल्या वाडिया समुहाचा वारसदार असलेल्या नेस वाडिया यांना मार्च महिन्यात 25 ग्रॅम कॅनाबिजसह होकाकीडोमधील न्यू चितोसे विमानतळावर अटक करण्यात आली होती. आरोपपत्र दाखल होऊन सुनावणीपर्यंत त्यांना तुरुंगवासच होता. 

सापोरो जिल्हास्तरीय न्यायलयाने त्याला दोन वर्षांचा तुरुंगवास ठोठावला, ज्याला गेली पाच वर्षे स्थगिती होती. शिक्षेची सुनावणी झाल्यानंतर आता तो भारतात परतला आहे. यापूर्वी बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटाने त्यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला होता.