नेतान्याहूंचा पक्ष बहुमताच्या संख्येजवळ

पीटीआय
बुधवार, 4 मार्च 2020

इस्राईलमधील सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी झालेल्या मतदानानंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या एक्झिट पोलमध्ये (मतदानोत्तर चाचण्या) पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांच्या लिकूड पक्षाला चांगले यश मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर नेतान्याहू यांनी आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी इतर पक्षांशी चर्चा सुरू केली आहे.

जेरुसलेम - इस्राईलमधील सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी झालेल्या मतदानानंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या एक्झिट पोलमध्ये (मतदानोत्तर चाचण्या) पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांच्या लिकूड पक्षाला चांगले यश मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर नेतान्याहू यांनी आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी इतर पक्षांशी चर्चा सुरू केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इस्राईलच्या १२० सदस्यांच्या संसदेत नेतान्याहू यांच्या उजव्या विचारांच्या पक्षाला ५९ जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. बहुमतासाठी ६१ जागांची आवश्यकता असल्याने आघाडीचे सरकार स्थापन्यासाठी करण्यासाठी नेतान्याहू यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. वर्षभराच्या कालावधीत इस्राईलमध्ये तिसऱ्यांदा सार्वत्रिक निवडणूक झाला आहे. इस्राईलच्या पंतप्रधानपदी सर्वाधिक काळ राहण्याचा मान मिळालेले नेतान्याहू हे सध्या राजकीय अस्तित्वाची लढाई लढत आहेत. दरम्यान, लिकूडच्या प्रवक्त्याने सांगितले की, सार्वत्रिक निवडणुकीत आमच्या पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आली आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: netanyahus party is close to the majority