...तर नोकरी सोडा; नेटफ्लिक्सची कर्मचार्‍यांना तंबी

कंपनीने स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्ममध्ये "कलात्मक अभिव्यक्ती" नावाचा एक विभाग समाविष्ट केला आहे
Netflix News
Netflix Newssakal

Netflix : सर्वाधिक लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म असलेल्या नेटफ्लिक्सने सात वर्षांच्या कार्यकाळात पहिल्यांदाच मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल केला आहे. एवढेच नव्हे तर, कंपनीने कर्मचाऱ्यांना ते सहमत नसलेल्या कॉन्टेंटवरदेखील काम करण्यास तयार रहा, असे सांगितले असून, जे अशा पद्धतीने काम करण्यास तयार नसतील ते कर्मचारी काम सोडू शकतात असे कंपनीने स्पष्ट केले आहे. याबाबत कंपनीने एक मेमो जारी केला आहे.

Netflix News
ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणायला लाज वाटते - नारायण राणे

कंपनीने स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्ममध्ये "कलात्मक अभिव्यक्ती" नावाचा एक विभाग समाविष्ट केला आहे. जो कंपनीच्या प्रेक्षकांसाठी प्रोग्रामिंगची श्रेणी ऑफर करण्याच्या योजनांचा तपशील देण्याचे काम करणार असून, यामध्ये दर्शकांना त्यांच्यासाठी काय योग्य आहे हे ठरवण्याची मूभा देत असल्याचे म्हटले आहे.

सध्या दाखवण्यात येणाऱ्या व्हिडिओ स्ट्रिमिंगमध्ये कंपनीला विविधता देण्याची इच्छा असून, यासाठी आम्हाला स्वतःच्या मूल्यांविरेधात काम करावे लागले तरी हरकत नसल्याचे नेटफ्लिक्सने नमूद केले आहे. त्यामुळे एखाद्या कर्मचाऱ्याला अपायकारक वाटणाऱ्या शीर्षकांवर काम करावे लागेल असे नेटफ्लिक्सने स्पष्ट केले असून, ज्या कर्मचाऱ्यांना कंपनीच्या तत्त्वांचे समर्थन करणे कठीण जात असेल त्यांच्यासाठी नेटफ्लिक्स हे सर्वोत्तम ठिकाण असू शकत नसल्याचे म्हटले आहे.

Netflix News
चिनी माध्यमांनी घेतली भारताची बाजू; G7 देशांना सुनावलं

चर्चेसाठी 18 महिने घालवले

दरम्यान कंपनीची नवीन तत्वे निश्चित करण्यासाठी कर्मचाऱ्यांसोबत चर्चेसाठी 18 महिन्यांचा कालावधि घालवल्याचे कंपनीच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. असे करण्यामागे कर्मचाऱ्यांना स्थिती समजू शकेल आणि ही कंपनी त्यांच्यासाठी योग्य आहे की नाही हे ठरवण्यासाठी मदत करू शकेल. या सर्व बदलांमध्ये नवीन मार्गदर्शक तत्त्वांवर अभिप्राय देण्याची संधी कर्मचाऱ्यांना दिली गेली असून, याबाबत कंपनीला 1,000 हून अधिक मतं मिळाली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com