Rafale : श्रद्धा की अंधश्रद्धा? राफेल विमानाखाली लिंबू ठेवल्याने नेटकरी संतापले!

टीम ई-सकाळ
Tuesday, 8 October 2019

अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्य असलेल्या राफेल विमानाची पूजा करताना नारळ वाहिला. मात्र, विमानाच्या चाकाखाली ठेवण्यात आलेल्या लिंबामुळे सगळीकडे चर्चांना तोंड फुटले. लिंबू ठेवणे ही श्रद्धा की अंधश्रद्धा? असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे.

गेल्या वर्षीपासून राफेल विमान हा विषय कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत राहिला आहे. अखेर मंगळवारी (ता.8) विजयादशमीच्या मुहूर्तावर राफेल हे लढाऊ विमान औपचारिकरित्या भारताच्या ताफ्यात दाखल झाले. फ्रान्समधील बोर्डोक्समधील विमान तळावर राफेल विमान हस्तांतरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

हा कार्यक्रम सुरू असताना एक गोष्ट अशी घडली, ज्यामुळे सोशल मीडियावर राफेल विमानाची आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना ट्रोल करण्यात येत आहे. आपण घरात साधा टिव्ही जरी घेतला तरी भारतीय संस्कृतीप्रमाणे त्याला हळद-कुंकू लावतो. आणि आजतर विजयादशमी असल्यामुळे सर्वत्र शस्त्रपूजनही केले गेले. तशीच पूजा राफेल विमानाची देखील केली गेली. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्य असलेल्या राफेल विमानाची पूजा करताना नारळ वाहिला. मात्र, विमानाच्या चाकाखाली ठेवण्यात आलेल्या लिंबामुळे सगळीकडे चर्चांना तोंड फुटले. लिंबू ठेवणे ही श्रद्धा की अंधश्रद्धा? असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे. 

एकीकडे भारत चंद्र, मंगळ या ग्रहांपर्यंत पोहोचला असताना दुसरीकडे देशाचे संरक्षणमंत्री असा प्रताप करत आहेत. यामुळे जगभरातील देश आपल्यावर हसत आहेत. त्यामुळे नेटकरी संतापले आहेत.  

दरम्यान, विजयादशमी आणि भारतीय हवाई दलाचा 87 वा स्थापना दिनानिमित्त पहिलं राफेल भारताच्या ताफ्यात दाखल झाल्याने हा दिवस संस्मरणीय ठरला आहे. या कार्यक्रमानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या विमानातून 35 मिनिटं प्रवास केला. हे विमान लवकरच भारतात आणले जाणार आहे. 

भारत आणि फ्रान्स या दोन देशांदरम्यान  2016 मध्ये राफेल खरेदीचा व्यवहार झाला होता. या व्यवहारानुसार 36 राफेल विमाने भारत फ्रान्सकडून विकत घेणार आहे. 7.87 अब्ज युरो एवढी किंमत मोजली जाणार आहे.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय हवाई दलामध्ये फक्त 24 वैमानिकच असे आहेत, जे राफेल विमान चालविण्यासाठी योग्य पात्रतेचे आहेत. या सर्व वैमानिकांच्या तीन तुकड्या करण्यात आल्या असून ते एक वर्षाच्या आत प्रशिक्षण पूर्ण करणार आहेत. पुढील वर्षीच्या मे महिन्यात राफेल विमान भारतामध्ये दाखल होणार आहे.

No photo description available.

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- भारताच्या भात्यात आज दाखल होणाऱ्या राफेलची वैशिष्ट्ये...

- दबंग 3 मधील 'रावण'चा फर्स्ट लूक पाहिला की नाही?

- Vidhan Sabha 2019 : बाळासाहेबांच्या बाबतीत घडलेला योगायोग राज ठाकरेंबाबत घडणार?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Netizens troll Rajnath Singh after worshiping Rafael aircraft