
ब्राझीलमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत
ब्राझिलिया- ब्राझीलमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार देशात कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनचा प्रवेश झाला असून तो प्रचंड वेगाने पसरत आहे. ब्राझीलच्या मानस शहरातील एकूण कोरोनाबाधितांपैकी कमाल अर्धे रुग्ण नव्या स्ट्रेनचे असल्याचे संशोधकांनी म्हटलं आहे. नवा विषाणू अधिक वेगाने पसरण्याचा धोका असल्याने देशात आणीबाणी सदृश्य परिस्थिती आहे.
इस्टर सबिनो यांच्या नेतृत्त्वातील एका टीममे मानस शहरातील रुग्णांची माहिती गोळा केली. त्यात असं दिसून आलंय की 42 टक्क्यांपेक्षा अधिक रुग्णांमध्ये नवा स्ट्रेन आहे. हा नवा स्ट्रेन यूके आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडलेल्या स्ट्रेनसारखाच दिसून आला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.
नेताजींच्या जयंतीनिमित्त मोदींचा लूक चर्चेत; फोटोने मोडला विक्रम
ब्राझीलमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशात कोरोना विषाणूची दुसरी लाट आली असून ती अधिक धोकादायक आहे. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आरोग्य व्यवस्था तोकडी पडत आहे. शेकडो लोक घरीच मरुन पडत आहेत. गंभीर असणाऱ्या लोकांना आयसीयू रुम मिळणे कठीण झाले आहे. सर्वांना ऑक्सिजनचा पुरवठा करणे अशक्य झाले आहे. असे असताना नव्या स्ट्रेनच्या देशातील शिरकावामुळे समस्या वाढली आहे.
मानस शहर प्रशासनाने कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन केला आहे. तसेच शारीरिक अंतराचे पालन करणे बंधनकारक केले आहे. तरीही शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. जानेवारी महिन्याच्या शेवटी-शेवटी कोरोना रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. नवा स्ट्रेन सुरुवातीच्या स्ट्रेनपेक्षा अधिक वेगाने पसरत असल्याचे दिसून येत आहे. नवा स्ट्रेन अधिक धोकादायक आहे का, याबाबत संशोधकांनी निश्चित असं भाष्य केलेलं नाही.
मोदी सरकारच्या योजनेनं करून दाखवलं; देशात मुलींचा जन्मदर वाढला!
नव्या स्ट्रेनच्या शिरकावामुळे संपूर्ण ब्राझीलमध्ये भीतीचे वातावरण आहे. नव्या स्ट्रेनला हाताळण्यासाठी सरकार शक्य ते पाऊलं उचलत आहे. अनेक शहरांमध्ये कडक लॉकडाऊन जारी केला आहे. नव्या स्ट्रेनचे ट्रान्समिशन रोखण्यासाठी प्लॅन तयार केला जात आहे. मानस शहरात बाहेरुन येणाऱ्या प्रत्येकाला विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. परदेशातून येणाऱ्या नागरिकांची विमानतळावरच तपासणी केली जात असून त्यांना सक्तीच्या विलगीकरणात ठेवले जात आहे. दरम्यान, देशात आतापर्यंत 90 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली असून 2 लाखापेक्षा अधिकांचा मृत्यू झाला आहे.