हिलरींच्या "ई-मेल'ची नव्याने चौकशी होणार

वृत्तसंस्था
रविवार, 30 ऑक्टोबर 2016

वॉशिंग्टन - अध्यक्षीय निवडणूक दहा दिवसांवर येऊन ठेपली असताना अमेरिकेची तपास संस्था "एफबीआय'ने ई-मेल प्रकरणाची नव्याने चौकशी सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने धक्का बसल्याचे डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्‍लिंटन यांनी म्हटले आहे.

2009 ते 2012 या काळात अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री असताना हिलरी यांनी काही गुंतवणूकदारांना खासगी सर्व्हर आणि ई-मेलचा वापर करत संपर्क साधल्याचा आरोप आहे. मात्र या प्रकरणी चौकशी थंडावल्यानंतर निवडणूक तोंडावर आली असताना आता पुन्हा चौकशी सुरू करण्यामागे कट असल्याचा संशय डेमोक्रॅटिक पक्षाने व्यक्त केला आहे. "एफबीआय'ने हिलरी यांना पत्र पाठवत चौकशी सुरू करत असल्याचे सांगितले. सरकारलाही या पत्राबाबत माध्यमांमधूनच समजल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: New enquiry of Hillarys emails