ऑस्ट्रेलिया: प्रभा कुमार हत्येप्रकरणी नवा पुरावा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

सिडनी - ऑस्ट्रेलियामध्ये गेल्या 7 मार्च रोजी प्रभा कुमार या भारतीय नागरिक असलेल्या महिलेच्या घडविण्यात आलेल्या हत्येप्रकरणी येथील पोलिस दलास नवे पुरावे आढळले आहेत. कुमार यांची हत्या घडविण्यात आल्याप्रकरणी भारतामधील कुणाचा हात आहे अथवा नाही, या नव्या शक्‍यतेचीही पोलिसांकडून चाचपणी करण्यात येत आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या कुमार यांची सिडनी पार्क येथील एका ट्रेनमधून उतरल्यानंतर धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली होती.

माईंड ट्री या आयटी कंपनीत काम करणाऱ्या कुमार वेस्टमीड येथील त्यांच्या घराकडे निघाल्याअ असतनाच त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. यावेळी त्या भारतामध्ये असलेल्या अरुण या त्यांच्या पतीशी बोलत होत्या. घरापासून अवघ्या 400 मीटरवर असतानाच हल्लेखोराने त्यांच्या गळ्यावर वार करत त्यांना क्रूरपणे ठार केले होते.

ऑस्ट्रेलियामधील पोलिस दलाकडून या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात येत आहे. कुमार यांना हल्लेखोराची माहिती असावी, असे दर्शविणारा कोणताही पुरावा पोलिसांना आढळलेला नाही. घटनास्थळी कुमार यांना ठार करण्यासाठी वापरण्यात आलेले शस्त्रही दिसून आलेले नाही. पोलिसांनी या प्रकरणी अद्याप 2000 जणांशी संवाद साधला आहे; तर सुमारे अडीचशे निवेदने नोंदवून घेतली आहेत. या पार्श्‍वभूमीवर, प्रभा कुमार यांच्या आयुष्याशी संबंधित अधिक माहिती मिळविण्याची आवश्‍यकता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

कुमार या ऑस्ट्रेलियात दोन वर्षांपासून जास्त काळ राहत होत्या. भारतात राहणाऱ्या त्यांच्या मुलीसाठी मालमत्ता विकत घेण्याच्या उद्देशाने त्या अत्यंत कष्ट करत होत्या.

Web Title: New lead in hunt for Prabha Kumar's killer