न्यूयॉर्कमध्येही मराठा क्रांती मोर्चाचा एल्गार

स्वप्निल पुरुषोत्तम खेडेकर (न्यूयॉर्क)
सोमवार, 17 ऑक्टोबर 2016

न्यूयॉर्क - महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक शहरात, गावात, खेड्यांत गोंगावणारे मराठा क्रांती मूक मोर्चाचे वादळ आता सातासमुद्रपार अमेरिकेतही पोहचले आहे. सकल मराठा समाजाच्यावतीने न्यूयॉर्कमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

कोपर्डीतील आरोपींना शिक्षा, मराठा आरक्षण यांसह विविध मागण्यांसाठी रविवारी (16 सप्टेंबर) न्यूयॉर्कमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात न्यूयॉर्क, न्यूजर्सी व कनेक्टिकट या तीन राज्यांतील मराठा समाजातील नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. मराठा समाजाच्या मागण्यांविषयीचे निवेदन या तीन राज्यांतील आठ युवतींतर्फे न्यूयॉर्कचे सिनेटर चक शुमर व संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे कायमस्वरुपी राजदूत सईद अकबरुद्दीन यांना देण्यात आले.

याबरोबरच या निवेदनाची प्रत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ई-मेल द्वारे पाठविण्यात येणार आहे. तसेच न्यूयॉर्क येथील भारताच्या राजदूत रिवा गांगुली दास यांना भेटून निवेदन सादर करण्यात येणार आहे. मराठा समाजाच्या या मोर्चाविषयी भारतीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी कुतूहलाने माहिती जाणून घेतली व पाठिंबा दर्शविला. येत्या दिवसांत कॅलिफोर्निया, फ्लोरिडा, कोलोरॅडो, विस्कॉन्सिन व वॉशिंग्टन येथे मोर्चाचे नियोजन करण्यात येणार आहे.

Web Title: New York also held to elect the Maratha revolution Morcha