भारताला न्यूयॉर्क परत करणार दहा कोटींच्या 15 अँटीक मूर्ती; जाणून घ्या, कोणी केली होती तस्करी?new york will return 15 antiques to india | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 idol smuggler Subhash Kapoor

भारताला न्यूयॉर्क परत करणार दहा कोटींच्या 15 अँटीक मूर्ती; जाणून घ्या, कोणी केली होती तस्करी?

न्यूयॉर्क सुप्रीम कोर्टाने भारताच्या 15 अँटीक मूर्ती परत करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. या मुर्त्या न्यूयॉर्कमध्ये असलेल्या मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट मध्ये होत्या.

न्यूयॉर्क सुप्रीम कोर्टाने संग्रहालयाच्या विरोधात एक सर्च वॉरेंट जारी केला होता त्यानंतर संग्रहालयाने लगेच घोषणा केली की ते भारताच्या 15 मूर्ती परत करणार. (new york will return 15 antiques to india after supreme court orders to met read in details)

सर्च वॉरेंटमध्ये 15 मूर्ती असून त्यात एक मध्य प्रदेशची 11व्या शतकातील बलुआ दगडापासून बनलेली Celestial Dancer (अप्सरा) आहे ज्याची किंमत 1 मिलियन डॉलरहून अधिक आहे. यात पश्चिम बंगालमधील पहिल्या शतकातील इसवी सन पूर्व यक्षी टेराकोटाचापण सहभाग आहे.

22 मार्चला न्यूयॉर्कच्या सुप्रीम कोर्टाने मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट विरोधात एक सर्च वॉरेंट जारी केला होता. मेनिनने न्यूयॉर्क पोलिस विभाग किंवा डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीच्या कोणत्याही एजेंटला या मूर्ती जप्त करण्याचा आणि उशीर न करता कोर्टात सादर करण्यासाठी दहा दिवसाचा वेळ दिला होता.

30 मार्चला मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टने सांगितले की भारतातून या मूर्ती अवैध प्रकारे आणले असल्याचे माहिती झाल्यानंतर आम्ही या मुर्ती भारत सरकारला परत करत आहोत.

या सर्व मूर्ती सुभाष कपूर नावाच्या व्यक्तीने विकल्या होत्या जो आता सध्या भारतात कारागृहात शिक्षा भोगत आहे. कुख्यात सुभाष कपूर 77 भारतीय अँटीक्सच्या तस्करी केल्याप्रकरणी त्याचं नाव आहे. आता तो तमिलनाडूच्या कारागृहात आहे.

सर्च वॉरेंटमध्ये 15 भारतीय मूर्ती होत्या. त्यांची किंमत 1.201 मिलियन डॉलर म्हणजेच 9.87 कोटी रुपये होते. सर्च वारंटमध्ये सांगण्यात आलंय की या मुर्ती चोरीला गेल्या होता आणि चोरीच्या या संपत्तीवर आपला हक्क सांगणे एक प्रकारे गुन्हा आहे.

सुभाष कपूरला 30 ऑक्टोबर 2011ला फ्रँकफर्टमध्ये अरेस्ट केलं होतं. त्यानंतर जुलै 2012 मध्ये त्याला भारतात आणण्यात आलं. 1 नोव्हेंबर, 2022 ला तमिलनाडूच्या कुंभकोणमच्या कोर्टाने कांचीपुरमच्या वरदराज पेरुमल मंदिरमध्ये सेंधमारी आणि मूर्तींची अवैध निर्यात केल्याप्रकरणी कपूरला10 वर्षाची जेलची शिक्षा सुनावली.

कपूरवर अमेरिकेसोबत आशियातील मूर्ती आणि कलाकृतींची तस्करी करण्याचा आरोप आहे. जुलै 2019 मध्ये होमलँड सिक्युरिटी इन्वेस्टिगेशन (HSI) द्वारा न्यूयॉर्कच्या एका कोर्टात एका तक्रारीमध्ये असे म्हटले होते की कपूरने तस्करी केलेल्या प्राचीन वस्तूंची किंमत $145.71 मिलियनहून अधिक आहे.

टॅग्स :New York