न्यूझीलंडचे आरोग्यमंत्री अखेर पायउतार; बीचवर गेल्यानंतर सहकाऱ्यावरील टीकाही भोवली

David-Clark
David-Clark

वेलींग्टन-  लॉकडाउन असताना कारमधून सहकुटुंब समुद्र किनाऱ्यावर गेल्यामुळे वादात सापडलेले न्यूझीलंडचे आरोग्यमंत्री डेव्हिड क्‍लार्क यांनी अखेर राजीनामा दिला. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डेर्न यांनी सप्टेंबरमधील निवडणूकीपूर्वी क्‍लार्क यांची मंत्रीमंडळातील उपस्थिती अडचण ठरल्याचे अलिकडेच मान्य केले होते.

जेसिंडा यांनी सांगितले की, ‘आपल्या आरोग्य व्यवस्थेवर जनतेचा विश्‍वास असणे अत्यावशक आहे. डेव्हिड मला म्हणाले की व्यक्तीपेक्षा संघाला प्राधान्य मिळणे गरजेते आहे.’

क्‍लार्क एप्रिलमध्ये घरापासून २० किलोमीटर दूर असलेल्या समुद्रकिनाऱ्यावर गेले होते. लॉकडाउनचे उल्लंघन केल्याची कबुली देताना त्यांनी स्वतःलाच ‘मुर्ख’ असे संबोधले होते. त्यानंतर त्यांचे पद कायम होते, पण ते लोकांच्या नजरेच्या टप्याबाहेर होते. पंतप्रधान जेसिंडा यांच्या दैनंदिन पत्रकार परिषदेला आरोग्य खात्याचे संचालक ॲश्‍ले ब्लुमफील्ड उपस्थित राहायचे.

न्यूझीलंडमधील रुग्णांची संख्या कमी असल्यामुळे आणि कोरोनामुक्त झालेला पहिला देश ठरल्यामुळे ब्लुमफिल्ड यांना लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ब्रिटनहून परतलेल्या दोन महिलांना क्वारंटाइन पूर्ण होण्याआधीच घरी जाण्याची परवानगी मिळाली. त्यामुळे पुन्हा नवे रुग्ण सापडले व काही निर्बंध लागू करावे लागले. या पार्श्‍वभूमीवर क्‍लार्क यांनी ब्लुमफिल्ड यांना धारेवर धरले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आधी टीका, मग कौतुक
क्‍लार्क यांनी राजीनामा देताना मात्र ब्लुमफिल्ड यांचे कौतूक केले. त्यांचे आणि आपले संबंध चांगले असून ब्लुमफिल्ड हे एक अतुलनीय सरकारी नोकर आहेत, असे ते म्हणाले. त्यांनी ब्लुमफिल्ड यांचे आभारही मानले तसेच त्यांच्या चमूला शुभेच्छा दिल्या. आरोग्य खात्याने शतकातील सर्वाधिक गंभीर संकटात अनोखी कामगिरी केल्याचेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com