न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी दिला मुलीला जन्म

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 जून 2018

''आम्ही खूप भाग्यवान आहोत. आम्हाला सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास सुदृढ मुलगी जन्माला आली. तिचे वजन 3.31 किलो आहे. मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. ऑकलँड सिटी रुग्णालयाच्या पथकाचेही आभार मानतो''.   

- क्लार्क गेफोर्ड, पंतप्रधान जॅकिंडा अड्रेन यांचे पती

वेलिंग्टन : न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅकिंडा अड्रेन यांनी आज (गुरुवार) मुलीला जन्म दिला. याबाबतची माहिती अड्रेन यांनी इंस्टाग्रामवर दिली. बाळ आणि जॅकिंडा हे दोघेही सुदृढ असल्याचे सांगितले. 
 
37 वर्षीय अड्रेन या न्यूझीलंडच्या सर्वात तरुण पंतप्रधान आहेत. त्यांनी मुलगी झाल्याचे सांगितले. ''आम्हाला मुलगी जन्माला आली. त्यामुळे आम्ही सगळे आनंदी आहोत. बाळ आणि जॅकिंडा हे दोघेही आरोग्यदायी आहेत. सर्वांचे मनापासून आभार''. मागील वर्षी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत जॅकिंडा अड्रेन या पंतप्रधानपदी विराजमान झाल्या. जेव्हा त्यांनी पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारला. तेव्हा त्या सर्वात तरूण पंतप्रधान ठरल्या. तसेच त्या देशातील पहिल्या महिला पंतप्रधान ठरल्या.

''आम्ही खूप भाग्यवान आहोत. आम्हाला सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास सुदृढ मुलगी जन्माला आली. तिचे वजन 3.31 किलो आहे. मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. ऑकलँड सिटी रुग्णालयाच्या पथकाचेही आभार मानतो''.   

जॅकिंडा यांनी त्यांच्या पती आणि नवजात बालिकेसोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ते सगळे स्मितहास्य करत असून, त्यांनी त्या बालिकेला वुलन ब्लँकेटमध्ये गुंडाळल्याचा फोटो शेअर केला आहे. 

दरम्यान, जॅकिंडा अड्रेन यांच्या प्रसुतीनंतर न्यूझीलंडच्या उपपंतप्रधान विन्स्टन पिटर पुढील 6 महिन्यांसाठी पंतप्रधानपदाचा कार्यभार पाहणार आहेत. याबाबतचा करारही काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New Zealand prime minister Jacinda Ardern gives birth to baby girl

टॅग्स