esakal | भारतीय महिलांबद्दल गलिच्छ वक्तव्य; अमेरिकेच्या माजी अध्यक्षाचा भारतद्वेष ऑडिओमधून आला समोर
sakal

बोलून बातमी शोधा

Richard Nixon.jpg

एका ऑडिओ क्लिपची चर्चा सुरु झाली असून यात अमेरिकीचे माजी राष्ट्रपती रिचर्ड निक्सन President Richard M. Nixon भारतींबाबत अत्यंत वाईट बोलत असल्याचं दिसत आहे. 

भारतीय महिलांबद्दल गलिच्छ वक्तव्य; अमेरिकेच्या माजी अध्यक्षाचा भारतद्वेष ऑडिओमधून आला समोर

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

वाशिंग्टन- अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या us election निवडणुकीला ६० दिवसांपेक्षाही कमी कालावधी राहिला आहे. अशात डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप  सुरु आहेत. डोनाल्ड ट्रम्प donald trump आणि जो बायडेन joe biden यांनी भारतीय-अमेरिकी मतदारांना आपल्याकडे ओढण्यासाठी त्यांच्यावर स्तुती सुमनांचा वर्षाव सुरु केला आहे. यात आता एका ऑडिओ क्लिपची चर्चा सुरु झाली असून यात अमेरिकीचे माजी राष्ट्रपती रिचर्ड निक्सन President Richard M. Nixon भारतींबाबत अत्यंत वाईट बोलत असल्याचं दिसत आहे. 

माणसांसाठी लस कधी? माकडानंतर उंदरावरही लशीचा यशस्वी प्रयोग

न्यूयॉर्क टाईम्सच्या एका रिपोर्टमध्ये प्रिंसटनमधील प्राध्यापक आणि लेखक गैरी जे. बास यांनी एका ऑडिओ क्लिपचा आधार घेत धक्कादायक खुलासा केला आहे. ऑडिओ क्लिपमध्ये तत्कालीन राष्ट्रपती निक्सन आणि त्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हेन्री किसिंजर यांचा भारत आणि दक्षिण आशिया प्रति असलेला दृष्टीकोन दिसून येतो.  निक्सन यांनी भारतीय महिलांबाबत अत्यंत गलीच्छ भाषा वापरली आहे. निक्सन किंसिजर यांना म्हणणात, भारतीय महिला या जगातील सर्वाधिक अनाकर्षित आहेत. त्या कशा पुनरुत्पादित करतात, मला कळत नाही.

गैरी जे. बास यांनी न्यूयॉर्क टाईम्समध्ये 'The Terrible Cost of Presidential Racism'या शिर्षकाखाली लेख लिहिला आहे. यात त्यांनी निक्सन आणि किसिंजर भारताचा किती द्वेष करायचे ते सांगितलं आहे. '४ नोव्हेंबर १९७१ रोजी व्हाईट हाऊसमध्ये भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भेटीनंतर विश्रांतीवेळी निक्सन किसिंजर यांना म्हणाले, ते मला उत्तेजीत करत नाहीत. ते दुसऱ्यांना कसे उत्तेजित करत असतील, हेन्री?', असं बास यांनी लिहिलं आहे.

निक्सन सरकारमधील तत्कालीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हेन्री किंगिजर यांचेही भारतीयांबद्दल वाईट मत होते. भारतीय हे खुशामत खोर आहे. ते कुणाचीही हांजीहांजी करायला तयार होतात. त्यामुळेच ते ६०० वर्षे टिकून राहिले आहेत. महत्वाच्या पदावरील लोकांना शोषून घेण्यात त्यांचा हातखंडा आहे, असं ऑडिओ क्लिपमध्ये किसिंगर म्हणाल्याचं बास यांनी लिहिलं आहे.

"लॉकडाऊनचा काहीही फायदा न झालेला भारत एकमेव देश"

अमेरिकेमध्ये सध्या वर्णवादावरुन चांगलेच वातावरण तापलं आहे. त्यात निक्सन यांच्या काही ऑडिओ क्लिप बाहेर आल्याने अमेरिकेचे राष्ट्रपतीही कसे वर्णवाद आणि वंशवादाने पूर्वग्रहदुषित होते हे दिसून येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीच्या प्रचारात अनेकदा रिचर्ड निक्सन यांचा उल्लेख केला आहे. निक्सन यांच्यावरही माझ्यासारखे आरोप झाले, पण ते निवडून आले, असं ट्रम्प म्हणाले होते. कृष्णवर्णींयावर होणाऱ्या अत्याचारांसाठी ट्रम्प यांच्यावर टीका होत आहे. अशीच परिस्थिती निक्सन यांच्या काळातही होती. 

दरम्यान, रिचर्ड निक्सन अमेरिकेचे ३७ वे राष्ट्रपती होते. रिपब्किकन पक्षाचे असलेले निक्सन यांनी १९६९ ते १९७४ या काळात आपला पदभार सांभाळला होता. या काळात भारत सोवियत युनियनकडे (आताचा रशिया) झुकला होता. तर पाकिस्तान अमेरिकेचा जवळचा मित्र होता. 

(edited by- kartik pujari)