
न्यूयॉर्क गोळीबार प्रकरण: 10 लोकांना गोळी मारणाऱ्या आरोपीला अटक
न्यूयॉर्क : न्यूयॉर्क मधील ब्रुकलीन मधील एका सबवे स्टेशन येथे १० लोकांना गोळी मारणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. ही व्यक्ती ६२ वर्षांची असून फ्रॅंक जेम्स असं या व्यक्तीचं नाव असून मॅनहॅट रस्त्यावर त्याला दोन पोलिस अधिकाऱ्यांनी बघितलं होतं. ही कारवाई १४ तासाच्या आत करण्यात आली असल्याची माहिती अमेरिकी माध्यमांनी दिली आहे.
दरम्यान ब्रुकलिन स्टेशन येथील मेट्रो स्टेशनवर मंगळवारी सकाळी 8.30 च्या सुमारास एका अज्ञाताने हल्ला केला होता. या हल्ल्यात १३ लोकं जखमी झाले होते. हल्ल्यानंतर हल्लेखोर फरार झाला होता. या प्रकारानंतर मेट्रोची वाहतूक थांबवण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी सगळा परिसर सील केला. त्यानंतर न्युयार्क पोलिस विभागाच्या आयुक्तांनी नागरिकांना आवाहन करत आम्ही हल्लेखोरांना पकडलं असल्याची माहिती दिली.
हेही वाचा: कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी 'या' पदार्थांचा करा आहारात समावेश
सकाळी साडेआठ वाजता झाला हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडेआठ वाजता हा हल्ला करण्यात आला. त्यादरम्यान गॅस मास्क घातलेला एक व्यक्ती सबवेच्या प्लॅटफॉर्मवर पोहोचला. प्रथम त्याने स्मोक बॉम्ब फेकला, ज्यामुळे कोणालाही काही समजू शकले नाही. या अचानक झालेल्या हल्लामुळे लोकांना काही समजले नाही आणि त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं.
दरम्यान या आरोपीने आपले हल्ले करतानाचे बरेच व्हिडीओ युट्यूबवर पोस्ट केले होते. ज्यामध्ये तो राजकीय व्यक्तींना टार्गेट करताना दिसत आहे. तसेच एका व्हिडीओमध्ये तो तेथील महापौरांविषयी टीका करताना दिसत आहे.
Web Title: Newyork Brooklyn Subway Station Shooting Criminal Arrest
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..