कोरोनामुळे महिला दारिद्र्याच्या गर्तेत; दक्षिण आशियातील स्थिती गंभीर 

पीटीआय
Friday, 4 September 2020

पुढील दशकात २५ ते ३४ या वयोगटातील महिला पुरुषांपेक्षा जास्त गरीब असतील, असा अंदाज संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) अहवालात व्यक्त केला आहे. हा अहवाल बुधवारी (ता. २) प्रसिद्ध झाला आहे. 

न्यूयॉर्क - कोरोनामुळे दक्षिण आशियातील महिलांमधील दारिद्र्याचा दर पुढील वर्षी वाढणार आहे. पुढील दशकात २५ ते ३४ या वयोगटातील महिला पुरुषांपेक्षा जास्त गरीब असतील, असा अंदाज संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) अहवालात व्यक्त केला आहे. हा अहवाल बुधवारी (ता. २) प्रसिद्ध झाला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘यूएन महिला व यूएन विकास कार्यक्रम’ (यूएनडीपी)ने म्हटले आहे की, कोरोनाच्या जागतिक साथीमुळे महिलांवर सर्वाधिक परिणाम होणार आहे. २०२१ पर्यंत चार कोटी ७० लाख महिला व मुली दारिद्र्याच्या गर्तेत लोटल्या जातील. या गटाला दारिद्र्यरेषेवर आणून प्रगतीकडे वाटचाल करण्यासाठी अनेक दशके लागली. पण कोरोनामुळे याच्या उलट परिणाम होणार आहे. ‘फ्रॉम इनसाईट्स टू ॲक्शन ः जंडर इक्वालिटी इन द वेक ऑफ कोविड- १९’ अहवालात म्हटले आहे की दक्षिण आशियात स्त्री-पुरुषांमधील गरिबीची दरी आणखी वाढणार आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मध्य, दक्षिण आशिया आणि आफ्रिकेच्या सहारा उपभागात जगातील ८७ टक्के सर्वांत गरीब लोक राहतात. कोरोनामुळे तेथील आंतरराष्ट्रीय दारिद्र्याखालील व्यक्तींच्या संख्येत अनुक्रमे पाच कोटी ४० लाख आणि दोन कोटी ४० लाखांची भर पडणार आहे. गरिबीतून नुकत्याच बाहेर पडलेल्या दक्षिण आशियातील अनेक कुटुंबांमधील महिला व मुलींवर कोरोनामुळे पुन्हा आर्थिक संकट येणार आहे, असेही अहवालात नमूद केले आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In next decade women will be poorer than men according to United Nations report