पुढीलवेळी आम्ही उत्तर देऊ - पाक संरक्षणमंत्री

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 सप्टेंबर 2016

इस्लामाबाद - भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवादी तळांवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकला पुढीलवेळी उत्तर देऊ, असे पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटले आहे.

आसिफ म्हणाले की, भविष्यात अशा प्रकारे भारताकडून करण्यात येणाऱ्या हल्ल्यांना आमचे लष्कर चोख प्रत्युत्तर देईल. पाकिस्तानी सैन्य आता तयार असून, यापुढे भारत आमच्या प्रदेशात येऊन अशा प्रकारच्या कारवाया करू शकणार नाही. भारताने केलेल्या हल्ल्यात दोन जवान ठार झाले असून, नऊ जवान जखमी झाले आहेत. 

उरी येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 17 जवान हुतात्मा झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर लष्कर आणि संरक्षण मंत्रालयाकडून आज (गुरुवार) पत्रकार परिषद घेण्यात आली. या परिषदेत रणबीरसिंग यांनी पाकव्याप्त काश्मीरमधील हल्ल्यांबाबत माहिती दिली. भारतीय लष्कराकडून सर्जिकल स्ट्राईक (नियंत्रित हल्ले) करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Next time, we will give strong reply, says Pakistan after India strikes in PoK