कोरोनाविरोधात लढाई जिंकणारे जगातील नऊ देश!

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 16 August 2020

जगभरात कोरोना महामारीचे हाहाकार माजवला आहे. अमेरिकेसारखी महासत्ता कोरोना विषाणू समोर हतबल होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत काही देशांनी कोरोनावर यशस्वीपणे नियंत्रण मिळवलं आहे.

जगभरात कोरोना महामारीचे हाहाकार माजवला आहे. अमेरिकेसारखी महासत्ता कोरोना विषाणू समोर हतबल होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत काही देशांनी कोरोनावर यशस्वीपणे नियंत्रण मिळवलं आहे.

1. न्यूझीलंडने 8 जून रोजी स्वत:ला कोरोनामुक्त घोषित केलं. त्यानंतर 100 दिवसात देशात एकही कोरोना रुग्ण सापडला नव्हता. मात्र, आता ऑकलंड प्रांतात सात रुग्ण सापडले आहेत. मात्र, अन्य भागात लॉकडाऊन उठवण्यात आला आहे. सध्या न्यूझीलंडमध्ये 1600 रुग्ण आहेत, तर आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा अॅडर्न यांनी कोरोना काळात उचललेल्या उपायांमुळे कोरोनाग्रस्तांची संख्या अटोक्यात आल्याचं सांगण्यात येतंय. न्यूझीलंडची लोकसंख्या 50 लाख आहे.

2. टांझानियाने 8 जून रोजी स्वत:ला कोरोनामुक्त घोषित केले आहे. आतापर्यंत देशात 509 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. देशात 21 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. टांझानियाने कोरोनाची आकडेवारी जाहीर करणे आता बंद केले आहे.

3. फीजीने स्वत:ला जूनच्या पहिल्या आठवड्यात कोरोनामुक्त घोषित केले होते. देशात आतार्यंत 28 कोरोना रुग्ण बरे झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. 

4 वॅटिकन सिटी हा जगातिल सर्वात छोटा देश आहे. या देशाने 6 जून रोजी स्वत:ला कोरोनामुक्त जाहीर केले होते. देशात 12 कोरोनाग्रस्त बरे झाले असून एकाचाही मृत्यू झालेला नाही. देशाची लोकसंख्या केवळ 825 आहे. या देशात प्रामुख्याने ख्रिश्चन धर्मगुरु राहतात. 

5. सेशेल्स  हा छोटा देश आहे. देशात आतापर्यंत 127 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. यातील सर्वांनी कोरोना विषाणूवर यशस्वीरित्या मात केली आहे. एकाही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही. 

6. सेंट किट्स अँड नेविस हा उत्तर अमेरिकेतील एक छोटा देश आहे. आतापर्यंत देशात 17 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. या सर्वांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे देशाने स्वत:ला कोरोनामुक्त घोषित केले आहे. 

7. ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेला असलेल्या तिमोर लेट्स या देशाने कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. आतापर्यंत देशात 25 कोरोनाबाधितांची नोंद झाली असून सर्वांनी विषाणूवर यशस्वीरित्या मात केली आहे. 

8. पापुआ न्यू गिनीमध्ये आतापर्यंत 271 कोरोनाबाधित सापडले आहेत. तर 3 रुग्णांचा कोरोनाचे जीव घेतला आहे.

9. चीनपासून काही किलोमीटर अंतरावर असणाऱ्या तैवान देशाने सर्व देशांसमोर आदर्श ठेवला आहे. तैवानची लोकसंख्या 2.38 कोटी आहे. मात्र, या देशात आतापर्यंत केवळ 481 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत.  केवळ 7 लोकांचा कोरोना विषाणूमुळे बळी गेला आहे. 

वरील सर्व देशांची लोकसंख्या ही खूप कमी आहे. त्यामुळे या देशांना सुरुवातीच्या काळातच कोरोनावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nine countries in the world winning the battle against Corona