ब्लॅकहॉक हेलिकॉप्टर्सची हवेत धडक! अमेरिकन आर्मीच्या 9 जवानांचा मृत्यू : Black Hawk Helicopter Crash | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Black Hawk Chopper_File Photo

Black Hawk Helicopter Crash: ब्लॅकहॉक हेलिकॉप्टर्सची हवेत धडक! अमेरिकन आर्मीच्या 9 जवानांचा मृत्यू

वॉशिंग्टन : अमेरिकेत लष्कराच्या दोन हेलिकॉप्टरला भीषण अपघात झाला असून यामध्ये एकूण ९ जवानांचा मृत्यू झाला आहे. रुटीन ट्रेनिंगदरम्यान बुधवारी रात्री ही दुर्घटना घडली, रॉयटर्सनं याबाबत वृत्त दिलं आहे. (Nine soldiers were killed in crash of two US Army Black Hawk helicopters)

अमेरिकन लष्करी प्रवक्त्याच्या माहितीनुसार, केंटकी इथं नियमित प्रशिक्षणादरम्यान अमेरिकन आर्मीच्या दोन ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरच्या अपघातात नऊ सैनिक ठार झाले. 101व्या एअरबोर्न डिव्हिजनचे क्रू मेंबर्स दोन HH-60 ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर उडवत होते. या दोन्ही हेलिकॉप्टर्सची बुधवारी उशीरा समोरासमोर धडक झाली आणि ते केंटकीच्या ट्रिग काउंटीवर क्रॅश झाले, अशी माहिती फोर्ट कॅम्पबेलच्या सार्वजनिक व्यवहार कार्यालयानं दिली आहे.

टॅग्स :global newsusa