इराकमध्ये इस्लामिक स्टेटच्या हवाई हल्ल्यात 9 दहशतवादी ठार

दियाला प्रांताच्या उत्तरेकडील उदिम भागात हवाई हल्ले केले आहेत.
Terrorists
TerroristsEsakal

बगदाद: इराकच्या (Iraq) पूर्वेकडील दियाला प्रांतात शनिवारी झालेल्या हवाई हल्ल्यात इस्लामिक स्टेट (IS)गटाचे नऊ अतिरेकी (Terrorists) ठार झाले. या हल्ल्यात आयएसचा एक स्थानिक नेताही सहभागी होता. इराकच्या संरक्षण सूत्रांकडून ही माहिती मिळाली.याआधी २१ जानेवारीला झालेल्या हल्ल्यात दियाला प्रांतातील हावी अल-अझीममध्ये ११ सैनिक ठार झाले होते.

लष्कराने यावर एक निवेदन दिले आहे. शनिवारी रात्री उशिरा जारी केलेल्या निवेदनात लष्कराने सांगितले की 'हवी अल-अझीममध्ये हे गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या दहशतवादी गटाचे नेमके ठिकाण ओळखले आहे'. इराकी युद्ध विमानांनी दियाला प्रांताच्या उत्तरेकडील उदिम भागात आयएसच्या ठिकाणांवर हवाई हल्ले केले आहेत असे लष्कराचे कर्नल एहाब मोहम्मद यांनी सांगितले.

इराकी लष्कराचे मोहम्मद म्हणाले की, लष्कराच्या दहशतवादी कारवायांवर बराच काळ आमची नजर होती. गेल्या काही महिन्यांपासून आम्ही त्यांच्या तीव्र हालचालींवर लक्ष ठेवून होतो. इतके करूनही त्यांना शोधण्यासाठी वारंवार लष्करी मोहीम राबवावी लागते. हवाई हल्ल्यात ठार झालेल्या नऊ दहशतवाद्यांमध्ये आयएसच्या एका स्थानिक नेत्याचा समावेश आहे असे ही त्यांनी सांगितले.

इराकच्या लष्करी दलांनी २०१७ मध्ये इस्लामिक स्टेट (IS) चा पराभव केला. तेव्हापासून इराकमधील सुरक्षा स्थितीत होत सुधारत आहे. परंतु, त्यानंतर आयएसचे लढवय्ये शहरी केंद्रे, वाळवंट परिसरात पसरले आहेत. ते सुरक्षा दल आणि नागरिकांवर सातत्याने हल्ले करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com