'कुलभूषणविरुद्ध मिळाले पुरावे; पण ते सबळ नाहीत'

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

इस्लामाबाद - पाकिस्तानमधील दहशतवादी आणि घातपाती कारवायांमध्ये सहभागी झाल्याचा आरोप असलेला गुप्तहेर कुलभूषण जाधव संदर्भातील पुरावे गोळा केल्याचा दावा पाकिस्तानचे परराष्ट्र सल्लागार सरताज अजीझ यांनी केला आहे. मात्र या पुराव्यांमध्ये कोणतेही सबळ पुरावे नसल्याचेही अजीझ यांनी पाकिस्तानच्या संसदेत बोलताना सांगितले आहे.

'पाकिस्तानमधील गुप्तचर संस्थांनी कुलभूषण जाधव संदर्भातील पुरावे सादर केले आहेत. सध्या पाकमधील तुरुंगात असलेल्या कुलभूषण विरुद्धचे हे पुरावे सबळ नसल्याचे गुप्तचर संस्थांनी म्हटले आहे', अशी माहिती अजीझ यांनी दिली आहे. मात्र तरीही रॉ पाकमध्ये कार्यरत असून ही सर्व माहिती संयुक्त राष्ट्र संघाकडे सादर करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. कोणतीही प्रतिक्रिया देण्यापूर्वी अजीज यांनी नेमके काय म्हटले याची खात्री करून घेण्यासाठी पुरेसा वेळ आवश्‍यक असल्याचे भारत सरकारने म्हटल्याचे एका इंग्रजी वृत्तपत्राने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

बलुचिस्तान सरकारने केलेल्या कारवाईत यावर्षी मार्चमध्ये कुलभूषण जाधवला इराणमधून पाकिस्तानात प्रवेश करताना अटक करण्यात आली होती. जाधव हे भारतीय गुप्तहेर असून, पाकिस्तानात घातपाती कारवाया करत असल्याचा आरोप त्यांच्या विरोधात ठेवण्यात आली होता. मात्र भारताने पाकिस्तानचा हा दावा फेटाळून लावत जाधव यांच्याशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर आपण भारताचे गुप्तहेर असल्याची कबुली देणारा जाधव यांचा व्हिडिओही पाकिस्तानी माध्यमांतून प्रसिद्ध झाला होता. मात्र, हा व्हिडिओ खोटा असल्याचे भारताने म्हटले आहे.

पाकिस्तानी माध्यमांचा कांगावा
पाकमधील गुप्तचर संस्थांनी गोळा केलेले पुरावे सबळ पुरावे नाहीत. मात्र तरीही पाकिस्तानमधील माध्यमांनी कुलभूषण जाधवविरूद्ध सबळ पुरावे मिळाले नसल्याचा कोठेही उल्लेख न करता केवळ पुरावे मिळाल्याचा कांगावा केला आहे.

Web Title: No conclusive proof against ‘Indian spy’ Jadhav: Aziz