कॅन्सर थेरेपीतील नव्या शोधासाठी यंदाचा नोबेल पुरस्कार

वृत्तसंस्था
सोमवार, 1 ऑक्टोबर 2018

वैद्यकीय क्षेत्रातील यावर्षीचा नोबेल पुरस्काराची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. या क्षेत्रातील निगेटिव इम्यून रेग्यूलेशनच्या इनहिबिशनद्वारा कॅन्सर थेरेपीचा नवा शोध लावणाऱ्या जेम्स एलिसन आणि तासुकू हॉन्जो यांना यावर्षीचा नोबेल पुरस्कार विभागून देण्यात आला आहे.

नवी दिल्ली-  वैद्यकीय क्षेत्रातील यावर्षीचा नोबेल पुरस्काराची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. या क्षेत्रातील निगेटिव इम्यून रेग्यूलेशनच्या इनहिबिशनद्वारा कॅन्सर थेरेपीचा नवा शोध लावणाऱ्या जेम्स एलिसन आणि तासुकू हॉन्जो यांना यावर्षीचा नोबेल पुरस्कार विभागून देण्यात आला आहे.

तसेच, यावर्षी साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणालाही न देण्याचा निर्णय नोबेल समितीने घेतला आहे. मागील 70 वर्षात पहिल्यांदाच साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार न कोणालाही न देण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. दरवेळेसप्रमाणे यावर्षीही वैद्यकीय क्षेत्रातील पुरस्काराच्या घोषणेनंतर रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र यासोबतच, जागतिक शांततेच्या पुरस्कारावर सगळ्यांच्या नजरा आहेत.

दरम्यान, नोबेल पारितोषिक हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रांतील अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनासाठी प्रतिवर्षी हा पुरस्कार दिला जातो. स्वीडिश वैज्ञानिक आल्फ्रेड नोबेलने आपल्या मृत्युपत्रात या पुरस्कारांची तरतूद केली. त्याच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी 1901 या वर्षापासून हा पुरस्कार देण्यास सुरवात झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nobel prize for medicine won by cancer researchers