malala yousafzai marriage
malala yousafzai marriageesakal

लग्न कशासाठी? म्हणणाऱ्या मलालाने तीन महिन्यातच उरकलं लग्न

ब्रिटनमधील बर्मिंघम येथील निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात तिने असर मलिकसोबत लग्न केले.
Summary

ब्रिटनमधील बर्मिंघम येथील निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात तिने असर मलिकसोबत लग्न केले.

तीन महिन्यांपूर्वी विवाह व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी नोबेल शांतता पारितोषिक विजेती मलाला युसूफझाईनेही लग्न केलं आहे. ब्रिटनमधील बर्मिंघम येथील निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात तिने असर मलिकसोबत लग्न केले. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. मलिक हा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा सदस्य आहे. मलालाने सोशल मीडियावरून याची माहिती दिली आहे. यासोबतच तिने काही फोटोही शेअर केले आहेत.

malala yousafzai marriage
Photos: नोबेल विजेती मलाला अडकली विवाहबंधनात

ब्रिटीश मासिक व्होगशी झालेल्या संभाषणात मलालाने लग्नाविषयी सांगितले होते की, विद्यापीठातील सहकाऱ्यांसोबत स्थायिक होण्याच्या अनुभवाने या शक्यतांना पुढे ढकलले. पुढे ती म्हणाली, 'मला एवढंच वाटत होतं की मी कधीच लग्न करणार नाही, कधीच मुलं होणार नाही, फक्त माझं काम करेन. मी नेहमी आनंदी आणि माझ्या कुटुंबासोबत राहीन. त्यावेळी मला समजले की, आपण कायमचे एकटे राहू शकत नाही.

काय म्हणाली मलाला?

या वर्षी जुलैमध्ये मासिकमध्ये दिलेल्या मुलाखतीत मलालाने विवाह पद्धतीवरच प्रश्न उपस्थित केले होते. ब्रिटीश मासिक व्होग मॅगझिनशी झालेल्या संवादात ती म्हणाली, 'लोकांना लग्न करणं का गरजेचं आहे, हे मला अजूनही समजलं नाही. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणीतरी हवं असेल तर तुम्हाला लग्नाच्या कागदपत्रांवर सही करण्याची काय गरज आहे. ही केवळ भागीदारी का असू शकत नाही?'' त्यावेळी तिच्या या विधानावर पाकिस्तानमध्ये जोरदार टीका झाली होती.

malala yousafzai marriage
नोबेल विजेती मलालाने केले लग्न; पती असर मलिक कोण?

लग्नानंतर मलालाने ट्विटरवर म्हटलं

लग्नानंतर मलालाने ट्विटरवर म्हटलं की, आज माझ्या आय़ुष्यातील खास दिवस आहे. असर आणि मी लग्न केलं. आम्ही आमच्या कुटुंबासोबत बर्मिंगहममधील घरीच निकाह केला. आम्हाला आशीर्वाद द्या. पुढच्या वैवाहिक आयुष्यासाठी आम्ही उत्सुक आहे.

पाकिस्तानी तालिबानींनी मलालावर मुलींच्या शिक्षणासाठी प्रचार करत असल्यानं गोळीबार केला होता. वयाच्या १५ व्या वर्षी स्कूल बसमध्ये मलालाच्या डोक्यात गोळी मारण्यात आली होती. अनेक महिन्यांच्या उपचारानंतर मलाला बरी झाली होती. २०१४ मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी तिला शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com