ऑस्करची नामांकने जाहीर; 'रोमा', 'द फेवरेट'ची सरशी

वृत्तसंस्था
गुरुवार, 24 जानेवारी 2019

लॉस एंजलिस : ब्लॅक पॅंथर, रोमा आणि दी फेवरेट यांच्यात ऑस्कर पुरस्कारातील वर्चस्वासाठी जोरदार चुरस असणार हे स्पष्ट झाले. या पुरस्काराची अंतिम नामांकने जाहीर करण्यात आली. 

लॉस एंजलिस : ब्लॅक पॅंथर, रोमा आणि दी फेवरेट यांच्यात ऑस्कर पुरस्कारातील वर्चस्वासाठी जोरदार चुरस असणार हे स्पष्ट झाले. या पुरस्काराची अंतिम नामांकने जाहीर करण्यात आली. 

भारतीय वेळेनुसार 25 फेब्रुवारीस सकाळी प्रसारीत होणाऱ्या या पुरस्कारात अर्थातच 1.3 अब्ज डॉलरची घवघवीत कमाई केलेल्या ब्लॅक पॅंथरला अर्थातच सर्वोत्तम चित्रपटाचे मानांकन लाभले आहे. मार्वल कॉमिक्‍समधील पात्रे असलेल्या या चित्रपटास ब्लॅक लेन्समन, बोहेमियन राप्सोडी, द फेवरेट, ग्रीन बुक, रोम, अ स्टार इज बॉर्न आणि व्हॉईस यांचे आव्हान असेल. रोमा आणि दी फेवरेट यांना एकंदरीत दहा नामांकने लाभली आहेत. यातील बहुसंख्य चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर खूपच यशस्वी ठरले आहेत. सर्वाधिक यशस्वी ब्लॅक पॅंथरला सात मानांकने आहेत. गतवर्षीपर्यंत प्रामुख्याने कलात्मक चित्रपटांना जास्त पसंती दिली जात असे. 

स्पेनमध्ये पूर्णपणे चित्रित केलेल्या तसेच मेक्‍सिकन भाषेत असलेल्या रोमाला विदेशी भाषेतील चित्रपटांच्या गटातही नामांकन आहे. त्याशिवाय दिग्दर्शक, अभिनेत्री, सहाय्यक अभिनेत्री, पटकथा तसेच अनेक तांत्रिक गटात नामांकन आहे, तर अठराव्या शतकातील कथेवर आधारीत असलेल्या दी फेव्हरेट या विनोदी चित्रपटाची मुसंडी धक्कादायक आहे. त्यांना अभिनेता, सहाय्यक अभिनेत्री, दिग्दर्शक या विभागात नामांकन आहे. 

लेडी गागा हीचा पदार्पण करणारा चित्रपट असलेल्या ए स्टार इज बॉर्नला आठ नामांकन आहेत. अर्थात त्यात गागा हीचे शॅलो हे लोकप्रिय गाणेही आहे. ब्रॅडली कूपर यांना सर्वोत्तम अभिनेतासाठी नामांकन लाभले, पण दिग्दर्शकाच्या शर्यतीत त्यांना स्थान नाही. क्रेझी रिच एशियन्स या चित्रपटास नसलेले एकही नामांकन धक्कादायक आहे तसेच ब्लॅंक पॅंथरचे दिग्दर्शक रायन कूगलर हे सर्वोत्तम दिग्दर्शकाच्या स्पर्धेत नाहीत. बुजुर्ग ग्लेन क्‍लोज यांना सातव्यांदा नामांकन लाभले आहे. त्यांनी यापूर्वी एकदाही ऑस्कर जिंकलेले नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nominations of Oscar are declare