माजी पंतप्रधानांच्या अडचणीत वाढ; तोशखाना प्रकरणात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी I Imran Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Imran Khan Pakistan

Imran Khan : माजी पंतप्रधानांच्या अडचणीत वाढ; तोशखाना प्रकरणात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी

पाकिस्तानातील (Pakistan) तोशखाना प्रकरणी (Toshkhana Case) इम्रान खान (Imran Khan) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. इस्लामाबादच्या सत्र न्यायालयानं (Islamabad Court) त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलंय.

या खटल्याची सुनावणी करणारे अतिरिक्त सत्र न्यायाधीश जफर इक्बाल यांनी हा निकाल दिला. मिळालेल्या माहितीनुसार, इम्रान खान हे सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात जामिनासाठी इस्लामाबाद उच्च न्यायालयात जाणार आहेत. मात्र, पोलिसांनी इम्रान खान यांची गाडी इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य गेटवरच अडवली.

यापूर्वी दहशतवाद विरोधी न्यायालय (ATC) आणि बँकिंग न्यायालयानं माजी पंतप्रधानांना न्यायालयीन आवारात हजर केल्यानंतर अंतरिम जामीन मंजूर केला. एटीसी न्यायाधीश राजा जवाद यांनी दहशतवादी प्रकरणाची सुनावणी केली आणि 100000 रुपयांच्या जामीन जातमुचलक्यासह 9 मार्चपर्यंत जामीन मंजूर केला. दरम्यान, न्यायमूर्ती रक्षंदा शाहीन यांनी पैशाच्या प्रकरणात खान यांच्या जामिनाला दुजोरा दिला.